ETV Bharat / city

मोनोरेल गाड्या तयार करण्यासाठी तीन 'देशी' कंपन्या उत्सुक, कोण मारणार बाजी? - मुंबई मोनोरेल

देशातील एकमेव मोनोरेल प्रकल्प असलेल्या चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गासाठी 10 अतिरिक्त गाड्यांची गरज आहे. तर 'आत्मनिर्भरते'चा नारा देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने या गाड्या देशातच बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

monorail trains
monorail trains
author img

By

Published : Mar 3, 2021, 3:30 PM IST

मुंबई - देशातील एकमेव मोनोरेल प्रकल्प असलेल्या चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गासाठी 10 अतिरिक्त गाड्यांची गरज आहे. तर 'आत्मनिर्भरते'चा नारा देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने या गाड्या देशातच बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासाठीच्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून तीन बड्या कंपन्यानी यासाठी निविदा सादर केल्या आहेत. तेव्हा आता अंतिम निविदेत कोण बाजी मारते आणि कोण पहिल्या देशी बनावटीच्या मोनो गाड्या तयार करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आजच्या घडीला धावताहेत केवळ 7 गाड्या -

20 किमीच्या मोनोरेलसाठी एमएमआरडीएने 15 मोनो गाड्यांचे कंत्राट स्कोमी या मलेशियन कंपनीला दिले होते. मात्र या कंपनीकडून केवळ 10 गाडयाच मिळाल्या. 1 फेब्रुवारी 2014 मध्ये मोनोचा चेंबूर ते वडाळा टप्पा सुरू झाला. तर चेंबूर ते जेकब सर्कल हा संपूर्ण 20 किमीचा मार्ग 2019 मध्ये सुरू झाला. या मार्गासाठी 15 ऐवजी 10 गाड्या उपलब्ध झाल्या. त्यानुसार 10 गाडयावर मोनो सुरू झाली. पण यातील 3 गाड्या खराब झाल्या आणि आज केवळ 7 मोनो गाड्या या मार्गावर चालत आहेत. त्यामुळे मोनोच्या फेऱ्या वाढवणे एमएमआरडीएला शक्य होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच 10 अतिरिक्त गाड्यासाठी एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी निविदा काढली होती. मात्र गेल्या वर्षी जूनमध्ये ही निविदा रद्द करत नव्याने निविदा मागवण्यात आली. तर देशातच मोनो गाडी तयार करण्याचा निर्णय घेत देशी कंपन्याकडून निविदा मागवल्या.

म्हणून आधीची निविदा रद्द-

10 मोनो गाड्या तयार करण्यासाठी एमएमआरडीएने मागवलेल्या निविदेला दोन चिनी कंपन्यानी प्रतिसाद दिला होता. या निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच गेल्या वर्षी भारत-चीन संघर्ष सुरू झाला. त्यानंतर चिनी कंपन्यांवर बहिष्कार घातला जाऊ लागला. त्यानुसार एमएमआरडीएने ही चिनी कंपन्यांवर बहिष्कार घालत ही निविदाच रद्द केली. तर आत्मनिर्भरतेचा नारा देत देशी कंपन्याकडून निविदा मागवल्या. आता लवकरच निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे.

या तीन कंपन्या उत्सुक -

एमएमआरडीएच्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन बड्या देशी कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. एमएमआरडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार BHEL, तितागड वॅगन्स आणि मेधा सर्वो ड्राइव्हज-एसएमएच रेल या कंपन्यानी निविदा सादर केल्या आहेत. आता लवकरच यातून एकाची निवड करत मोनो गाड्याच्या बांधणीचे कंत्राट दिले जाणार आहे. तेव्हा आता यात कोण बाजी मारते, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.