मुंबई - मुंबई विमानतळावर एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने ही कारवाई 8 तारखेला केली आहे. या कारवाई दरम्यान 10 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. हे अमली पदार्थ एका विदेशी अमली पदार्थ तस्कराच्या पोटातून काढण्यात आले आहेत. या तस्कराला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर अटक केली. गुप्त माहिती दाराच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. ती कारवाई 8 ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजता करण्यात आली आहे. यात आरोपीने गुन्ह्यासाठी विदेशी टॅक्टिक वापरल्या होत्या. यामध्ये आरोपीने आपल्या पोटामध्ये 1.050 किलो कोकेन हे अमली पदार्थ लपवले होते. हे कोकेन कॅप्सूल स्वरूपात होते आणि आपल्या पोटामध्ये लपवले होते.
आरोपीची प्राथमिक चौकशी सुरू असतानाच त्याला अस्वस्थपणा जाणवू लागला. त्यामुळे आरोपीला मुंबईतल्या जे जे रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. आरोपीची तपासणी केली असता त्याच्या पोटात कॅप्सुल्स असल्याचे दिसून आले. त्यानंतर वैद्यकीय शस्त्रक्रिया करून 1-1 कॅप्सूल बाहेर काढण्यात आले. यातल्या प्रत्येकी एका कॅप्सूलमध्ये 14.7 ग्राम कोकेन होते. असे एकूण 70 कॅप्सूल आरोपीच्या पोटातून बाहेर काढले असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांनी दिली आहे.