ETV Bharat / city

मुंबई फिरण्यासाठी आलेल्या दोघांना ट‌ॅक्सी चालकांनी लुटले, पोलिसांनी केले 24 तासात अटक - Taxi drivers robing passengers

मुंबईत विजयवाडा येथून फिरण्यासाठी आलेल्या दोन प्रवाशांना लुटल्याची घटना घडली आहे. प्रवाशांकडून जबरदस्तीने हजारो रुपये उकळणाऱ्या टॅक्सी चालकांना एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

Taxi drivers robing two passengers in Mumbai
मुंबईत दोन प्रवाशांना ट‌ॅक्सी चालकांनी लुटले
author img

By

Published : Jan 29, 2020, 4:27 PM IST

मुंबई - शहरात बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांकडून जबरदस्तीने हजारो रुपये उकळणाऱ्या टॅक्सी चालकांना एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी सोमवारी अटक केली. मुंबई फिरण्यासाठी विजयवाडा येथून आलेल्या दोन प्रवाशांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये या टॅक्सी चालकाने उकळले. फकिरा ठाकरे आणि गणेश स्वामी, अशी चालकांची नावे असून याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे प्रवाशांची लूटमार केल्याचे तपासात समोर आले.

मुंबई फिरण्यासाठी आलेल्या दोघांना ट‌ॅक्सी चालकांनी लुटले... चालकांना पोलिसांनी 24 तासात केली अटक

हेही वाचा... औरंगाबाद शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा राडा, ३ जखमी

२५ जानेवारीच्या रात्री गणपत राम नावाचा २१ वर्षीय तरुण आपल्या भावासह मुंबईतील सायन येथे आला होता. त्यावेळी सायन ते दादर असा प्रवास करण्यासाठी गणपतने टॅक्सी पकडली. मात्र हा टॅक्सी प्रवास दोघांच्या जीवावर बेतला असता. टॅक्सी चालकाने त्यांना दादरला न नेता एलफिन्स्टन येथे नेले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देवून गणपत व त्याच्या भावाकडून ७ हजार रुपये उकळले. ही घटना घडल्यानंतर या संदर्भात एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर केवळ 24 तासात दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा... नाशिक बस दुर्घटना : 26 जणांचा मृत्यू.. शेतकरी धावले होते मदतीला

मुंबईत नाईट लाईफची सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबईत दिवसाढवळ्या घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता नाईट लाईफमध्ये सुद्धा गुन्हे वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किती सुरक्षित आहे, हा एक प्रश्न सध्या समोर आहे. मुंबईत 58 हजार टॅक्सी सध्या रस्त्यावर धावतात. मात्र याहून विना नोंदणी झालेल्या बनावट परवाना घेऊन चालणाऱ्या टॅक्सी चालकांची संख्या मोठी आहे. नाईट लाईफ सुरू झाल्याने रात्रीच्या वेळी अनधिकृत टॅक्सी चालकांची संख्याही तेवढीच वाढणार असून प्रवाशांच्या लुटीच्या घटना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

Intro:मुंबई बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांकडून जबरदस्तीने हजारो रुपये उकळणाऱ्या टॅक्सी चालकांना एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी सोमवारी अटक केलीये. मुंबई फिरण्यासाठी विजयवाडा येथून मुंबईत आलेल्या दोन प्रवाशांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये टॅक्सी चालकाने उकळलेत... फकिरा ठाकरे आणि गणेश स्वामी अशी या चालकांची नावे असून याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे प्रवाशांची लूटमार केल्याचं तपासात समोर आलंय.

Body:२५ जानेवारीच्या रात्री गणपत राम नावाचा एक २१ वर्षीय तरुण आपल्या भावासह मुंबईतील सायन येथे आला असता सायन ते दादर असा प्रवास करण्यासाठी गणपतने टॅक्सी पकडली. मात्र हा टॅक्सी प्रवास दोघांच्या जीवावर बेतली असता. टॅक्सी चालकाने दादरला न नेता एलफिन्स्टन येथे नेले आणि जीवे ठार मारण्याची धमकी देवून गणपत व त्याच्या भावाकडून ७ हजार रुपये उकळले. ही घटना घडल्यानंतर या संदर्भात एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असता केवळ 24 तासात दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.

मुंबईत नाईट लाईफची सुरुवात झाली आहे मात्र मुंबईत दिवसाढवळ्या घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता
नाईट लाईफ मध्ये सुद्धा गुन्हे वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक किती सुरक्षित आहे हा सुद्धा एक प्रश्न सध्या समोर आहे . मुंबईत सध्या 58 हजार टॅक्सी सध्या रस्त्यावर पळत आहेत मात्र याहून विना नोंदणी झालेल्या बनावट परवाना घेऊन चालणाऱ्या टॅक्सी चालकांची संख्या मोठी आहे. मात्र नाईट लाईफ सुरू झाल्याने रात्रीच्या वेळी अनधिकृत टॅक्सी चालकांची संख्याही तेवढीच वाढणार असून प्रवाशांच्या लुटीच्या घटना रोखण्याचे चॅलेंज पोलिसांसमोर असणार आहे. Conclusion:( रेडी टू अपलोड पॅकेज जोडले आहे.)

( बाईट- प्रणय अशोक, डीसीपी )
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.