ETV Bharat / city

इतर दीपालींना न्याय मिळणार! कामाच्या ठिकाणी महिला संरक्षणासाठी टास्क फोर्स नेमणार - PoSH act

कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक व अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुधवारी बैठक झाली.

विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार

author img

By

Published : Mar 31, 2021, 5:46 PM IST

Updated : Mar 31, 2021, 6:50 PM IST

मुंबई : राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटीत व असंटीत क्षेत्रात कामाच्या ठिकाणी महिलांचे अत्याचारापासून संरक्षण व्हावे यासाठी असलेल्या विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.

बैठकीत ठाकूर यांच्या सूचना

कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक व अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुधवारी बैठक झाली. यावेळी प्रधान सचिव आय ए कुंदन, कामगार विभागाच्या सचिव विनिता वेद तसेच सामान्य प्रशासन, उद्योग, उर्जा, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तक्रारींची चौकीशी करण्यासाठी सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर तक्रार समिती गठित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांनी या नियोजनासाठी एक समन्वय अधिकारी निवडावा व त्यांच्या कार्यक्षेत्रातील लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त करुन संबंधित स्थानिक तक्रार समितीकडे पाठवाव्यात. याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांना सादर करुन त्यांनी तो अहवाल महिला व बालविकास विभागास प्रत्येक वर्षाच्या ३० एप्रिलपूर्वी सादर करावा अशी तरतूद नियमानुसार आहे. याबाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार करावी, असे निर्देशही यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.

विशाखा समिती स्थापन करणे अनिवार्य
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत विशाखा समिती नेमणे अनिवार्य आहे. शासकीय तसेच खासगी कार्यालयांत विशाखा समितीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळावा यासाठी कठोर पावले उचलावी, तसेच अमंलबजावणीकरिता टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा असे निर्देश यावेळी यशोमती ठाकूर यांनी दिले.

Last Updated : Mar 31, 2021, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.