ETV Bharat / city

Beauty Tips : नवरात्रोत्सवात मेकअप करताना घ्या त्वचेची काळजी - नवरात्रोत्सवात मेकअप करताना घ्या त्वचेची काळजी

सुंदर दिसण्यासाठी महिलांकडून वेगवेगळ्या सौदर्यप्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होता. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाजारात मिळणारी सौंदर्यप्रसाधने ( Cosmetics ) खरेदी केली जातात. मात्र, गेल्या काही काळात त्वचेवर त्याचे परिणाम होताना दिसून येत आहेत. दोन वर्षाच्या खंडानंतर नवरात्रीचा जोश पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. विशेषतः महिलांनी यावेळी त्वचेची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ( Take Care Of Your Skin while Applying Makeup During Navratri Festival )

Beauty Tips
मेकअप
author img

By

Published : Sep 16, 2022, 10:58 AM IST

मुंबई - येत्या दोन दिवसांपासून नवरात्रोत्सव ( Navratri Festival ) सुरु होणार आहे. नवरात्रीमध्ये दांडिया खेळताना आकर्षक, सुंदर दिसण्यासाठी महिलांकडून वेगवेगळ्या सौदर्यप्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होता. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाजारात मिळणारी सौंदर्यप्रसाधने ( Cosmetics ) खरेदी केली जातात. मात्र, गेल्या काही काळात त्वचेवर त्याचे परिणाम होताना दिसून येत आहेत. दोन वर्षाच्या खंडानंतर नवरात्रीचा जोश पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. विशेषतः महिलांनी यावेळी त्वचेची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ( Take Care Of Your Skin while Applying Makeup During Navratri Festival )

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सौंदर्य प्रसाधने खरेदी करा - नवरात्रोत्सव दोन दिवसांवर आल्याने सुंदर त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रकार करत आहेत. बाजारात उपलब्ध असणारी स्वस्त सौंदर्यप्रसाधने मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्वचेवर या सौंदर्यप्रसाधनांचा थर चढवणे किंवा त्वचेची अजिबात काळजी न घेतल्याने अनेकांना अॅलर्जी होते. त्वचेला अ‍ॅलर्जी होत असेल, तर सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापरामुळे किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी केलेल्या उपयांच्या मिश्रणामुळे होऊ शकते. अशावेळी अनेक जण यातून मार्ग काढण्यासाठी एकाच वेळी वेगवेगळे उपाय चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. यंदा नऊ दिवस रात्री बारा वाजेपर्यंत दांडिया खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोठ्या जल्लोषात सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवात सौंदर्यप्रसाधानांच्या आहारी जाऊन चेहरा विद्रुप होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सौंदर्य प्रसाधने खरेदी करा, असा सल्ला त्वचा तज्ञांकडून दिला जातो.

फंक्शननंतर शक्य तितक्या लवकर मेकअप धुवा - प्रथम, मेकअप चांगल्या दर्जाचा असावा. ब्रँडेड मेकअप महाग असतो परंतु त्वचेच्या सुरक्षिततेसाठी त्यांची चाचणी केली जाते. दुसरे म्हणजे, जर तुम्हाला पूर्वी न वापरलेल्या मेकअपच्या वस्तू वापरायच्या असतील, तर शरीराच्या काही भागांवर जसे की कानाच्या मागे किंवा पाठीवर एक छोटा चाचणी पॅच करणे. तसेच, फंक्शननंतर शक्य तितक्या लवकर मेकअप धुवा. धुतल्यानंतर कोरडेपणा टाळण्यासाठी बेबी सोप किंवा डोव्हसारखे सौम्य साबण वापरणे चांगले. मेकअप धुल्यानंतर, मॉइश्चरायझर वापरण्याचा देखील सल्ला दिला जातो. काही पुरळ असल्यास, कृपया घरगुती उपचार टाळा आणि त्वचेचा सल्ला घ्या. ही फक्त मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. परंतु त्याचे पालन केल्यास समस्या टाळता येतील, असे जेजे रुग्णालयाचे त्वचा रुग्ण तज्ञ डॉ. रत्नाकर मेहता यांनी सांगितले.

अशी घ्या त्वचेची काळजी - एखादा पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला अ‍ॅलर्जी झाली असेल तर तो पदार्थ त्वचेवर लावणे योग्य ठरणार नाही. जुनी, एक्सपायरी डेट उलटून गेलेली, व्यवस्थित न झाकलेली सौंदर्यप्रसाधने वापरणे टाळा.

- कोणतेही मिश्रण तयार करण्यासाठी नेहमी स्वच्छ भांडे आणि चमच्याचा वापर करा.

- दोन व्यक्तींची त्वचा सारखी नसते. जे तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या त्वचेसाठी फायदेशीर असेल, ते तुमच्या त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर असेलच असे नाही. त्यामुळे मित्र किंवा मैत्रिणींच्या सल्ल्याने सौंदर्यप्रसाधने वापरता काळजी घ्या.

- नवीन प्रॉडक्ट वापरणार असाल, तर आधी कमी प्रमाणात वापरा. तुमच्या त्वचेला त्याची सवय होऊ द्या.

- कानाच्या मागे किंवा मानेवर पॅच टेस्ट करायला विसरू नका. घरगुती उपचारांनासुद्धा ही कृती लागू पडते.

- त्वचेवरील छिद्रे बंद करणाऱ्या उत्पादनापासून लांब राहा.

- सल्फेट्स, पॅराबेन्स आणि कृत्रिम सुगंध असलेली उत्पादने वापरणे टाळा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.