ETV Bharat / city

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा - महापौर किशोरी पेडणेकर - corona case in mumbai

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना बरे करण्यासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरु आहे. काही ठराविक डॉक्टरांनी सांगितलेल्या लोकांनाच हे इंजेक्शन दिले जात आहे.

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा - महापौर किशोरी पेडणेकर

author img

By

Published : Apr 11, 2021, 8:10 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना बरे करण्यासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा सीवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरु आहे. काही ठराविक डॉक्टरांनी सांगितलेल्या लोकांनाच हे इंजेक्शन दिले जात आहे. अधिक किंम्मत घेऊन विकले जात आहे. याची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याणी घाटकोपरच्या दर्पण मेडिकल दुकानाला भेट दिली. मात्र महापौर येणार असल्याचे समजताच दुकानदारांने पळ काढला.

रेमडेसिवीरचा काळाबाजार -

मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार आहे. गेल्या दोन महिन्यापासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मुंबईत सध्या ९० हजाराहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांपैकी १६ टक्के रुग्णांना लक्षणे आहेत. त्यापैकी काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा रुग्णांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रेमडेसिवीर हे इंजेक्शन वापरले जाते. खडगी रुग्णालयातील डॉक्टर हे इंजेक्शन बहुतेक रुग्णांच्या नातेवाईकाना सांगत आहेत. असेच काही रुग्णांचे नातेवाईक घाटकोपर येथील दर्पण मेडिकल या दुकानाबाहेर लाईन लावून उभे होते. मात्र लाईनमधील लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन न देता काही ठराविक डॉक्टरांनी सांगितल्यावर इंजेक्शन दिले जात होते.

कारवाई करा-

हा प्रकार रांगेत उभ्या असलेल्या लोकांनी महापौराच्या कानावर घातला. महापौरांनी या दुकानाला भेट दिली. महापौर येत आहेत समजताच या दुकानवाल्याने दुकान बंद करून पळ काढला. महापौरांनी तातडीने घाटकोपर येथील पालिकेच्या एन विभागाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. इंजेक्शनसाठी रांगा लावल्या जात आहेत. रांगेमधून सर्वाना इंजेक्शन मिळत नाही, एखाद्या रुग्णांसाठी डॉक्टर किंवा ईतर कोणी फोन केल्यास इंजेक्शन दिले जाते. रांगेमध्ये असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नाही हे चुकीचे आहे. अशा मेडिकल दुकानवाल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती महापौरांनी दिली.

पालिका रुग्णालयात उपचार घ्या -

लोकांनी कोरोनाची लागण झाल्यास योग्य वेळी उपचार करून घ्यावेत. खासगी रुग्णालयांसारखीच सुविधा आणि उपचार पालिका तसेच सरकारी रुग्णालयातही दिले जातात. यामुळे मला हेच हॉस्पिटल पाहिजे असे न म्हणता पालिकेच्या रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये उपचार घ्यावेत, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

पालिकेकडे २२ हजार रेडीसीवीरचा साठा -

मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांवर उपचार करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून पालिकेने कोविड सेंटरमध्ये खाटा वाढवण्यास सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयामधील खाटा पालिका ताब्यात घेत आहे. पालिका रुग्णालय, कोविड सेंटर येथे ऑक्सिजन टँक उभारण्यात आले आहेत. रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे यासाठी २२ हजार इंजेक्शनचा साठा पालिकेकडे आहे. २५ हजार आणखी इंजेक्शनचा साठा मागवण्यात आला आहे. तसेच आणखी २ लाख इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे.

हेही वाचा- शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल..!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.