मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे युवतीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे. त्यातच उत्तर प्रदेश पोलिसांनी रातोरात या पीडितेचा मृतदेह जाळल्याचे समोर आले. यानंतर हे संपूर्ण प्रकरण चिघळले आहे. त्यामुळे आता योगी सरकारवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. ही घटना दुर्दैवी असून आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
या प्रकरणाविषयी आम्ही पंतप्रधानांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे त्या म्हणाल्या.