ETV Bharat / city

Supreme court hearing on Shivsena : पुन्हा तारीख पे तारीख.. शिवसेना वादाची सुनावणी १२ ऑगस्टला होण्याची शक्यता

author img

By

Published : Aug 7, 2022, 6:42 AM IST

शिवसेना पक्षातील अंतर्गत वादाचे प्रकरण ( Supreme court hearing on Shivsena matter ) सध्या न्यायप्रविष्ट आहे. सलग दोन दिवसांनंतर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार होती. या सुनावणीला आता तारीख पे तारीख ( Shivsena court case status ) देण्यात आली आहे. त्यामुळे, सोमवारी ८ ऑगस्टला होणारी सुनावणी ( Shivsena and Supreme court ) बुधवारी १२ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.

supreme court hearing on shivsena matter
शिवसेना सुनावणी सर्वोच्च न्यायालय लांबणीवर

मुंबई - शिवसेना पक्षातील अंतर्गत वादाचे प्रकरण ( Supreme court hearing on Shivsena matter ) सध्या न्यायप्रविष्ट आहे. सलग दोन दिवसांनंतर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार होती. या सुनावणीला आता तारीख पे तारीख ( Shivsena court case status ) देण्यात आली आहे. त्यामुळे, सोमवारी ८ ऑगस्टला होणारी सुनावणी बुधवारी १२ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ३ ऑगस्टची सुनावणी ४ ऑगस्टला ( Shivsena and Supreme court ) झाली होती.

हेही वाचा - Varsha Raut ED Inquiry : पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊतांची ईडीकडून 9 तास चौकशी

एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या ( Shivsena news ) मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हे सरकार बेकादेशीर पणे स्थापन झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर आपणच शिवसेना असून, आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा शिंदे गटाकड़ून करण्यात येत आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवादही झाले. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने देखील आपली बाजू मांडली. दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत सध्या कुठलाही निर्णय घेऊ नका, असे निर्देश सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे.

महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली होती. त्यामुळे, राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले होते. मात्र, अचानक सोमवारची सुनावणी पुढे ढकलली असून, संभाव्य तारीख १२ ऑगस्ट देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर संभाव्य तारीख नमूद केली आहे. सुनावणी लांबणीवर गेल्याने आता या प्रकरणात आता खंडपीठ नेमणार की १२ ऑगस्टला सरन्यायाधीश निर्णय देणार याबाबत सांशकता आहे.

हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 1931 कोरोना रुग्णांची नोंद; 12 हजार सक्रिय रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.