मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील आज (शुक्रवार) शेवटचा आणि पाचवा दिवस आहे. आज विधानसभेत मुख्यत्वे अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे.
हेही वाचा... आदिवासींसह वंचित घटकांना सीएए आणि एनपीआरचा त्रास होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
पंचवीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सरकार चर्चेसाठी मांडणार आहे. यात 15 हजार कोटी हे महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी आहेत.
गुरुवार मराठी राजभाषा दिन होता. त्यामुळे कोणताही विरोध पाहायला मिळाला नाही. मात्र, आज पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारच्या काळातही मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या मांडल्या जात होत्या. अर्थसंकल्प तोंडावर असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या कशाला ? असा प्रश्न विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना विचारला जाण्याची शक्यता आहे. त्याच मुद्द्यावर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.