ETV Bharat / city

Sunday Street Mumbai : मुंबईकरांचा 'संडे स्ट्रीट'ला उत्स्फूर्त प्रतिसाद, रस्त्यावर उभारल टेनिस कोर्ट - मुंबई पोलीस

मुंबई पोलिसांनी 'संडे स्ट्रीट' ही संकल्पना आज पासून राबवण्यास सुरुवात केली आहे. यानुसार मुंबईतील काही रस्ते हे अंशतः तर काही ठिकाणी पूर्णतः सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. याला मुंबईकरांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संडे स्ट्रीट
संडे स्ट्रीट
author img

By

Published : Mar 27, 2022, 11:02 AM IST

Updated : Mar 27, 2022, 12:56 PM IST

मुंबई : मुंबईकरांना तणावमुक्त व आरोग्यदायी वातावरणात आठवड्यातील किमान काही तास तरी घालवता यावेत या हेतूने मुंबई पोलिसांनी 'संडे स्ट्रीट' ही संकल्पना आज पासून राबवण्यास सुरुवात केली आहे. यानुसार मुंबईतील काही रस्ते हे अंशतः तर काही ठिकाणी पूर्णतः सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. याला मुंबईकरांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुंबईकरांचा 'संडे स्ट्रीट'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

रस्त्यावर उभारल टेनिस कोर्ट - मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाला प्रतिसाद द्या मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर चक्क टेनिस कोर्टच लोकांनी उभं केलं व सकाळी सकाळी समुद्राच्या शेजारी टेनिस खेळण्याचा आनंद लुटला. याचा लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत स्त्री-पुरुष सर्वांनीच इथं खेळत आपली मॉर्निंग फ्रेश केली.

मुलांचं सायकलिंग - मुंबईच्या हेवी ट्राफिक मध्ये अनेक लोक गाड्या चालवण्यास घाबरतात त्याचप्रमाणे पालकदेखील आपल्या मुलांना सायकल शिकवताना घाबरतात. मात्र, आजच्या संडे स्ट्रीटचा फायदा घेत अनेक पालकांनी आपल्या मुलांना सायकल शिकवण्याचा प्लॅन केला. यावेळी अनेक पालक आपल्या मुलांना सायकल शिकवताना दिसले.

मुलांचं सायकलिंग
मुलांचं सायकलिंग

काय आहे स्ट्रीट संडे - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुंबई पूर्वपदावर आली आहे. निर्बंधांमुळे गेले दोन वर्ष धावती मुंबईला ब्रेक लागला होता. अनेकजण ताण तणावात जीवन जगत आहेत. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून संडे स्ट्रीट हा उपक्रम सुरू झाला आहे. मुंबईतील 13 रस्त्यांवर सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आज राबवला जाणार आहे. सकाळपासूनच या उपक्रमाला मुंबईकरांनी काही ठिकाणी गर्दी केली होती तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Last Updated : Mar 27, 2022, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.