ETV Bharat / city

Central Railway Megablock : रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; तर पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

author img

By

Published : Mar 26, 2022, 8:43 PM IST

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे ( Mega Block In Central Railway ) मार्गावर रविवारी  27 मार्च 2022 रोजी मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याण ( Thane Kalyan Megablock ) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Central Railway Megablock
Central Railway Megablock

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे ( Mega Block In Central Railway ) मार्गावर रविवारी 27 मार्च 2022 रोजी मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याण मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे. रविवारी पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावर दिवसाचा कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.

मध्य रेल्वे मेगाब्लॉक - मध्य रेल्वेमार्गावरील ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 7.55 ते सायंकाळी 7.50 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा मुलुंड, ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील या सर्व सेवा त्यांच्या नियोजित आगमना पेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोचतील. कल्याण येथून सकाळी 8.36 ते सायंकाळी 7.50 पर्यत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे, मुलुंड स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा त्यांच्या नियोजीत आगमनापेक्षा 10 मिनिटे उशिराने आपल्या गंतव्यस्थानांवर पोहोचतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10.34 ते सायंकाळी 3.54 पर्यत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल बेलापूर वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबई अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.

ट्रान्स हार्बर मार्गावर रात्रकालीन ब्लॉक - मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी अप-डाऊन मार्गावरील रात्र कालीन मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. हा ब्लॉक आज मध्य रात्री 11.45 ते पहाटे 5.45 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत ठाणे आणि ऐरोली स्थानकादरम्यान भुयारी मार्गासाठी आरएच गर्डर्स आणि बॉक्स टाकण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आज रात्री 11.09 ते पहाटे 5.53 वाजेपर्यंत ठाणे येथून वाशी नेरूळ पनवेल साठी सुटणाऱ्या डाऊन सेवा रद्द करण्यात येणार आहे. तर पनवेल नेरूळ वाशी येथून आज रात्री 11.09 ते पहाटे 5.27 वाजेपर्यंत ठाणे कडे जाणाऱ्या अप सेवा रद्द करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक - रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर मार्गावर बोरीवली ते अंधेरी स्थानकाच्या अप- डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा मेगाब्लॉक आज मध्य रात्री 11.45 ते 3.45 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत बोरीवली ते अंधेरी अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

हेही वाचा - Devendra Fadnavis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.