ETV Bharat / city

Sudhir Mungantiwar Critisized Shivsena : 'एमआयएम भाजपची बी टीम असेल, तर शिवसेना ही काँग्रेसची बी टीम' - एमआयएम शिवसेना युती

आमदार सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar Critisized Shivsena ) यांनी एमआयएम ही भाजपची बी टीम असेल, तर शिवसेना ही काँग्रेसची बी टीम आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांना लगावला आहे.

Sudhir Mungantiwar Critisized Shivsena
Sudhir Mungantiwar Critisized Shivsena
author img

By

Published : Mar 20, 2022, 6:45 PM IST

मुंबई - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel ) यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray On MIM ) यांनी यावर भाष्य करताना भाजपवर सडकून टीका केली आहे. त्याच सोबत एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचे सांगितले आहे. यावर बोलताना माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar Critisized Shivsena ) यांनी एमआयएम ही भाजपची बी टीम असेल, तर शिवसेना ही काँग्रेसची बी टीम आहे, असं सांगितलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रतिक्रिया

'मुख्यमंत्री वैफल्यग्रस्त भूमिकेतून भाष्य करत आहेत' -

एमआयएम व महाविकासआघाडी यांच्यातील युतीवरून राजकारण तापलेल असताना आता सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना ही काँग्रेसची बी टीम असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचं सांगितलं. त्यास प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात निवडणूक जिंकण्यासाठी नाहीतर लोकांची मनं जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे व त्यास कोण थांबू शकत नाही, असेही मुंगटीवार म्हणाले. त्याच बरोबर मुख्यमंत्री हे वैफल्यग्रस्त भूमिकेतून भाष्य करत आहेत, असेही मुनगंटीवार म्हणाले. शिवसेना खासदार, आमदार, कार्यकर्ते यांच्यात आता असंतोष आहे. महाराष्ट्रातील जनतेने लोकहितासाठी, जनहितासाठी, राज्याच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी शिवसेनेला भाजप युतीला निवडून दिले. परंतु त्यांनी घाईघाईने बेइमानी केली. सत्तेच्या प्रेमापोटी जनादेशाचा अवमान करत ते वागले. त्यांच्याच पक्षाचे आमदार त्यांच्या सरकार विरुद्ध हस्ताक्षर अभियान करत आहेत. तेव्हा त्यांना एकत्र ठेवण्यासाठी अशी भूमिका उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागत आहे, असं सांगत जो 'बूँद से गयी, हौद से नही आती', असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.

'अजब सरकारची गजब कहाणी' -

प्रत्येकाला आपली टीम मजबूत करण्याचा अधिकार आहेत. जयंत पाटील यांनी येणाऱ्या निवडणुकीत ११० जागा राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येणार, असं सांगितलं आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की जर जयंत पाटील यांच्या बोलण्या प्रमाणे १०० जागा राष्ट्रवादी लढवत असेल व १०० जागावर ते निवडून येत असतील तर उरलेल्या १८८ जागांमध्ये काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी ९४ जागा लढवाव्या लागतील. परंतु ये पब्लिक है सब जानती है! लोक कुठल्याही परिस्थितीमध्ये यंदा शिवसेनेला समर्थन देणार नाहीत. ज्या शिवसेनेचे भगवा झेंडा घेतला व त्यांनीच आता भगव्याची बेइमानी केली आहे, असेही ते म्हणाले. १९८८ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर मैदानात घोषणा केली होती की, मी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करेन. पण त्यात ते पूर्ण अपयशी झाले. बॉम्ब स्फोटात आरोपी असलेला देशद्रोही दाऊद इब्राहिम याच्या बरोबर संबंध असलेला मंत्री नवाब मलिक मांडीला मांडी लावून या मंत्रिमंडळात बसत आहे. त्याच बरोबर छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी प्रमुख भूमिका बजावली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, आयुष्यात मी पुन्हा कधी छगन भुजबळला मंत्री होऊ देणार नाही. परंतु आता त्यांचे शब्द मागे पडले असून ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात तेच उद्धव ठाकरे यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. म्हणजेच 'अजब सरकारची गजब कहाणी', असा टोमणाही मुनगंटीवार यांनी लावला आहे.

'स्वतःचे वचन शिवसेनेने मोडले आहे' -

याप्रसंगी मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर प्रखर टीका करत अंगार कधी भंगार झाला, हे आता जनता पहात आहे, असे म्हटले आहे. स्वतःचे वचन शिवसेनेने मोडले आहे. आता हिंदुत्व कुठे गेलं? असेही त्यांनी म्हटले आहे. माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले असताना बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा चप्पल काढून मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. हे सर्व विसरून स्वतःच्या मनाचे समाधान करण्यासाठी उद्धव ठाकरे, अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत, असेही ते म्हणाले. मेहबूबा मुक्ती सोबत आम्ही गेलो. परंतु आम्ही आमच्या कंडीशनवर त्यांच्यासोबत गेलो. परंतु उद्धव ठाकरे, पवार साहेबांच्या कंडीशनवर राज्यामध्ये आले. म्हणून शिवसेनेकडे एक नगर विकास खात सोडलं, तर एकही महत्त्वाचं खात नाही, असा टोमणाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.