मुंबई: मंत्रालयातून अचानक हटविण्यात आलेला संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा फलक (board of Dasasutri) शिंदे सरकारला पुनर्स्थापित करावा लागला आहे. माजी मंत्री तथा संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्या अध्यक्षा आणि काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शिंदे सरकारला हा फलक पुन्हा लावावा लागल्याची चर्चा मंत्रालयात आहे. (yashomati thakur letter)
![yashomati thakur letter](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-mantralay-dashsutri-7210546_04102022172822_0410f_1664884702_1023.jpeg)
ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र: यशोमती ठाकूर ह्या संत गाडगे महाराज यांची कर्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांनी या निर्णया विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना २७ ऑक्टोबर २०२२ रोजी थेट पत्र लिहित आपल्या संतप्त भावना कळवल्या. त्या पत्रात त्यांनी तो फलक पूर्वीप्रमाणेच लावण्याचा आग्रह केला होता. सोबतच समाजमाध्यमातून सुद्धा त्यांनी हा विषय लावून धरला होता. अखेर सरकारला माघार घेवून, संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’चा फलक येत्या दोन दिवसात नव्याने लागेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली.
यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया: सरकारच्या या निर्णयावर माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे ‘ईडी’ सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय बदलण्याचा शिंदे सरकारने जणू विडाच उचलला आहे. त्यातच व्यक्ती द्वेषातून म्हणा किंवा अन्य काही कारणाने, मुंबईतील मंत्रालयातील प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा लावलेला फलक एकाएकी हटविण्यात आला होता. यामुळे जनतेमध्ये राज्य सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आणि त्याचे पडसाद समाजमाध्यमात उमटू लागले होते".
मंत्रालयात दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकल्याचा आनंद आहे, असेही ठाकूर म्हणाल्या.