ETV Bharat / city

सीबीआय प्रमुखपदी सुबोध कुमार जैस्वाल, राज्यातील 'हे' नेते येऊ शकतात अडचणीत - who is new CBI head

महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या विरोधात ईडी व सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. या मधील शिवसेना पक्षातील आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ याबरोबरच महाविकास आघाडीतील इतर नेते मंडळींच्या विरोधात सीबीआयकडून पुढील टप्प्यात कारवाई केली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

who is new CBI head
सीबीआयच्या प्रमुखपदी सुबोध कुमार जैस्वाल
author img

By

Published : May 26, 2021, 11:53 AM IST

मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहणारे व राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांची केंद्र सरकारकडून सीबीआयच्या प्रमुख पदी वर्णी लावण्यात आलेली आहे. १९८५ च्या बॅचचे असलेले सुबोध कुमार जैस्वाल यांचा सीबीआयच्या प्रमुख पदी चा कार्यकाळ हा 2 वर्षाचा असणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीसाठी कुठे तरी हा अडचणीचा विषय ठरण्याची शक्यता असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

आघाडी सरकारमध्ये सुबोध कुमार जैस्वाल हे नाराज ! -

सुबोध कुमार जैस्वाल यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदी असताना मुंबईचा कायदा व सुव्यवस्थेबद्दल चांगले काम पाहिले होते. त्यानंतर त्यांची बढती होऊन पोलीस महासंचालकपदी त्यांची वर्णी लागली होती. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काही कारणास्तव सुबोध कुमार जैस्वाल हे नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्यानंतर जैस्वाल यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलेले होते. सीबीआय प्रमुखपदाचे दावेदार असलेले सुबोध कुमार जैस्वाल यांची अखेर या पदावर नियुक्ती झाली आहे. पुढील 2 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असणार आहे.

राज्यातील काही नेते येऊ शकतात सीबीआयच्या रडारवर -

महाराष्ट्रबद्दल बोलायचे झाले तर राज्यातील काही निवडक असे संवेदनशील विषय सीबीआयकडे तपासासाठी आलेले आहेत.
१) बॉलिवूड चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या संदर्भातील तपास सध्या सीबीआयकडे आहे. मोठ्या वादानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास राज्य सरकारकडून सीबीआयला देण्यात आलेला होता.

२) मुंबई पोलीस खात्याचे तत्कालीन आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूलीचा आरोप केल्यानंतर या संदर्भातील तपास सीबीआयकडून केला जात आहे.

३) महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या विरोधात ईडी व सीबीआयकडून कारवाई करण्यात येत आहे. या मधील शिवसेना पक्षातील आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ याबरोबरच महाविकास आघाडीतील इतर नेते मंडळींच्या विरोधात सीबीआयकडून पुढील टप्प्यात कारवाई केली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

या पूर्वी पार पाडल्या या महत्वाच्या जबाबदाऱ्या -

२० हजार कोटी रुपयांच्या स्टॅम्प घोटाळा प्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख पद सुबोध कुमार जैस्वाल यांनी भूषवले होते. याबरोबरच महाराष्ट्र पोलिसांच्या आतंकवादी पथकाची जबाबदारी सुद्धा सुबोध कुमार जैस्वाल यांनी सांभाळली होती. मुंबई पोलीस आयुक्तपदी 1 वर्ष तरी पोलीस महासंचालकपदी 2 वर्ष काम पाहिले आहे. यामुळे राज्यातील राजकारण, पोलीस खाते व इतर गोष्टींविषयी सुबोध कुमार जैस्वाल यांना चांगली माहिती असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

फोन टॅपिंगचा गुप्त अहवाल जैस्वाल यांच्याकडे आला होता -

फोन टॅपिंग प्रकरणी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉक्टर रश्मी शुक्ला यांची सायबर पोलिसांकडे जबाब नोंदविण्यात आलेली आहे. डॉक्टर रश्मी शुक्ला यांनी राज्यात पोलिस अधिकाऱ्यांकडून क्रिम पोस्टिंगसाठी मंत्री व गृह खात्यातील अधिकाऱ्यांना पैसे देत असल्याचा एक अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांच्याकडे पाठवला होता. या गुप्त अहवालामध्ये त्यांनी राज्यात बदल्यांसाठी एक प्रकारचे नेक्सस काम करत असून हा विषय गंभीर असल्याचे सुबोध कुमार जैस्वाल यांना पाठवण्यात आलेला अहवालामध्ये त्यांनी म्हटले होते. त्यामुळे सुबोध कुमार जैस्वाल यांनी सदरचा अहवाल हा त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता.

हेही वाचा - कोव्हॅक्सिनला जुलै ते सप्टेंबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळणार मंजुरी-भारत बायोटेक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.