मुंबई - भाजप नेते आशिष शेलार यांनी दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व गुजरातचे मुख्यमंत्री भुपेन पटेल यांचा प्रथम निषेध करावा, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai Slammed Ashish Shelar ) यांनी लगावला. शेलार कधी निषेध करणार याची वाट पाहत असल्याचे ते म्हणाले. उद्योगमंत्री हे मंत्रालयातील पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईतील उद्योग पळविण्यासाठी ममता बॅनर्जींना महाराष्ट्रद्रोही शिवसेना मदत करत असल्याचा आरोप भाजप नेते शेलार यांनी केला होता.
भाजप आमदार आशिष शेलार यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना स्टाईलने प्रत्युत्तर दिले आहे.
शेलार यांनी प्रथम त्यांचा निषेध करावा
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ( Politics after Mamata Banerjees Mumbai visit ) मुंबई दौरा चांगलाच गाजला आहे. या दौऱ्यावरून भाजप आमदार अशिष शेलार यांनी बुधवारी राज्य सरकारबरोबरच शिवसेनेवर गंभीर आरोप केले. शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले, की शेलार यांनी असेच जागृत राहायला हवे. उद्योग विभाग शिवसेनेकडे आहे. उद्योग पळविण्याचा प्रश्नच येत नाही. उलट ( Maharashtra first in business among the India ) आरबीआयच्या आकडेवारीनुसार उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. कोरोना काळातही राज्य सरकारने उद्योग टिकवले आहेत. मात्र, योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. ते काय युपीमधील उद्योग इकडे आणण्यासाठी आले नव्हते. त्यावेळी अशिष शेलार यांनी निषेध करायला पाहिजे होता.
हेही वाचा-Pawar Support to Mamata - Fadnavis : काँग्रेसला बाजूला ठेवून मोट बांधण्यात ममतांना पवारांची साथ - फडणवीस
वडाची साल पिंपळाला-
मुंबईत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. परराज्यातून लोक मुंबईत येतात, असे देसाई यांनी ठणकावले. तसेच विदेशात जाऊन उद्योग आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे देसाई यांनी सांगितले. परंतु, भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील नेते आले. तेव्हा ते काही बोलत नाहीत. विरोधी राज्यातील लोक आली की, त्यांना पोटदुखी होते. मात्र यामागे त्यांचे पोटशूळ वेगळे आहे. केंद्रात भाजप विरोधात विरोधक एकत्र येत आहे. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी केले जात आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची गुप्त बैठक झाली. मग काय चर्चा झाली हे शेलार यांना कसे माहीत? मुळात वडाची साल पिंपळाला असा हा प्रकार असल्याचे उद्योगमंत्री देसाई म्हणाले.
हेही वाचा-Ashish Shelar on Banerjee and Thackeray meet : शिवसेनेने महाराष्ट्र द्रोह केला - अशिष शेलार
मुंबई जागतिक आर्थिक केंद्र
आयएफसी केंद्र मुंबईत, व्हावे हे पहिलेच ठरले होते. केंद्र सरकारने ( Maharashtra Industry Minister on IFC center ) मात्र गुजरातमध्ये आयएफसी केंद्र करण्यासाठी परवानगी दिली आहे. भाजपने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. जगाला माहीत आहे की मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने भाजपकडून पळवापळवी सुरू आहे. मुंबईत जागतिक अर्थिक केंद्र ( Mumbai as world economic center ) उभारण्यात आम्ही ठाम आहेत. मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र होणार आहे. आम्ही तज्ज्ञांच्यासोबत विचार करत आहोत. आम्ही जागा सांगितली पळवा पळवा सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून ज्या ठिकाणी हे केंद्र नियोजित होते, त्या ठिकाणी ( केंद्र सरकार बुलेट ट्रेन सुरू करत असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.
लोकांची विचार करायची कुवतच तेवढी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची तब्येत ठिक आहे. त्यांनी रुग्णालयामधूनही काम केले आहे. काही लोक अफवा उठवत आहेत. त्यांची ती विचार करण्याची पद्धत तशीच आहे, असा टोला देसाई यांनी भाजपला लगावला आहे.
तिसरी लाट येणार नाही
नवीन विषाणुसंदर्भात मी काही माहिती घेतली आहे. या विषाणूंमुळे आफ्रिकेत कोणाला दवाखान्यात अॅडमिट केले नाही. पण आपल्याला सतर्क राहावे लागेल, असे देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्राला नेहमीच आकसाने पाहिले जाते, हे सीताराम कुंटे यांच्या प्रकारावरून स्पष्ट होते. महाराष्ट्राला सोडून इतर दोन राज्यांच्या मुख्य सचिवांना मुदतवाढ देण्यात आली आहे.