ETV Bharat / city

Subhash Desai Attacked Amit Shah : केंद्र व गुजरातकडून महाराष्ट्राचे वैभव पळवण्याचा प्रकार -सुभाष देसाई

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुण्यातील वक्तव्यावर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या वैभवाची शाहांना दखल घ्यावीशी वाटत असेल किंवा मदत करायची असेल तर त्याचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील उद्योग हे केंद्राकडून आणि गुजरातकडून पळवले जात आहेत. ते आधी थांबवा,असा टोला देसाई यांनी लगावला आहे.

Subhash Desai on amit shaha
Subhash Desai on amit shaha
author img

By

Published : Dec 20, 2021, 3:53 PM IST

Updated : Dec 20, 2021, 7:03 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री अमित शाह ( Union Minister Amit shaha) यांनी पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना खुले आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि महाविकास आघाडीने एकत्र लढून भाजपचा पराभव करून दाखवावा, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas aaghadi sarkar) खोचक टोला लगावला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान आता शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनीही या शाह यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

शिवसेना नेते सुभाष देसाई

सुभाष देसाई म्हणाले की, (Subhash Desai reaction on Amit Shah Statement) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे यांचे हे राजकीय भाष्य होते. राज्याला गतवैभव मिळवून देण्यास मविआ हतबल, असे अमित शाह म्हणाले होते. त्याला योग्य ते उत्तर आमचे नेते देतील. परंतु महाराष्ट्राच्या वैभवाची शाहांना दखल घ्यावीशी वाटत असेल किंवा मदत करायची असेल तर त्याचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील उद्योग हे केंद्राकडून आणि गुजरातकडून पळवले जात आहेत. ते आधी थांबवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, सरकारने कोरोना काळातही मोठं काम केलं आहे. केंद्रकडून राज्यावर अन्याय होत आहे. आमचं वैभव पळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधी फडणवीस सरकार काहीच बोलत नव्हते. आम्ही स्पष्टपणे बोलतो. मुंबईत आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजार करण्यासारखे सगळं काही मुंबईत आहे. आर्थिक केंद्र मुंबईत आहे.

कोणत्याही कंपनीला भारतात काही उद्योग, बँक सुरू करायची असेल तर ती मुंबईत सुरू होते. मात्र गुजरातमध्ये सुरू केले जात आहे. मुंबईत सुरू केलं तर ते उत्तम चालेल. दत्तपंथ थेंगडी कामगार शिक्षण संस्था ही संस्था दुसरीकडे हलवली.

केंद्र सरकारकडून दुजाभाव -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असतात. या सरकारला शोधावं लागत. हे लोक राज्याला गतवैभव मिळवून देणार आहेत काय? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी त्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राज्याचे असलेले वैभव पळवून नेण्याचे काम केंद्राने आणि गुजरातने पहिल्यांदा थांबवावे, फडणवीस काळातही उद्योगांची पळवापळवी झाली. त्यांनी मौन व्रत घेतले होते. मात्र आम्ही आता गप्प बसणार नाही, असा सूचक इशारा देसाईंनी दिला. तसेच राज्याला गतवैभव मिळवून द्यायचा असल्यास केंद्राने सरकार सोबत दुजाभाव करू नये, असेही ठणकावले.

भाषेला अभिजात दर्जा मिळवून द्या -

कोरोना काळात दोन लाख कोटी रुपये राज्य सरकारने आणले. आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजार करण्यासारखा सगळं काही मुंबईत आहे. जागतिक आर्थिक केंद्राचा मान मुंबईलाच हवा. कारण कोणत्याही कंपनीला भारतात काही उद्योग बंद करायचे असेल तर ती मुंबईतच सुरू होते. मुंबई हेच आर्थिक केंद्र आहे. पण केंद्राने गिफ्ट गुजरातला सुरू केले. जे चालतच नाही. मुंबईत सुरू केलं असतं तर उत्तम चालले असते, असे देसाई यांनी सांगताच नागपूर मधील दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण संस्था दिल्लीला हलवली. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्राला कागदपत्रे पुरवली. परंतु, जाणीवपूर्वक दिल जात नाही, असा आरोप मंत्री देसाई यांनी केला.

जनतेचे नुकसान -

केंद्राकडे जीएसटीची 6340 कोटींची थकबाकी आहे. मागील सहा वर्षांपासून दोन मेडिकल कॉलेज मंजूर झाले आहेत. तर यूपीला 27 मेडिकल कॉलेज मंजूर आहेत. 2700 कोटी यूपीला आणि महाराष्ट्राला 263 कोटी दिले. सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असताना रेमडेसिवीर दिले. तसेच अमित शहा यांनी राज्य सरकारला गतवैभव मिळवून देण्यासाठी बसून चर्चा करू, केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे राज्यातील जनतेला नुकसान होत असल्याचे मंत्री देसाई म्हणाले.

..त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला -

राज्यात सरकार स्थापनेपूर्वी झालेल्या गुप्त चर्चेचा अमित शाह दोन वर्षांनी उलगडा केला. आता तीन वर्षात निवडणुका होणार आहेत. त्यावेळी समोरासमोर येऊ आणि बघू काय होतंय ते. हिंदुत्वावर संकट येईल तेव्हा भाजपची लोक शेपूट घालून बसतात, असा आरोप देसाई यांनी केला. तसेच मुख्यमंत्री आजारी असले तरी कारभारात काही फरक पडलेला नाही. मुख्यमंत्री अधिवेशनात सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट करताना आमचे प्रेम तीन चाकांवर आहे, असेही ते म्हणाले.

रामदास कदमांची पक्ष दखल घेईल -

शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनेतील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले. कदम सेनेचे नेते आहेत. गंभीर मुद्दे असतील तर गंभीर दखल घेतली जाईल, असे देसाई म्हणाले.

Last Updated : Dec 20, 2021, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.