मुंबई - कोरोनाच्या रुग्णांची संख्या ( Increasing corona patients in Mahrashtra ) दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभीवर राज्याच्या उद्योग विभागामार्फत नवीन नियमावली लवकरच जाहीर ( Corona rules for business ) करण्यात येणार आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai on corona rules for industries ) म्हणाले, की राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे खबरदारीच्या सर्व उपाययोजना घेण्याची गरज आहे. मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे याआधीच्या सूचना सर्वांनी पाळल्या पाहिजेत.
हेही वाचा-Kalichran Maharaj : कालीचरण महाराजांना अखेर बेड्या; छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सरकार आमने-सामने
उद्योगांनाही कोरोनाची नियमावली - देसाई
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, की कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर त्याचा सर्वात आधी परिणाम रोजगारावर ( Covid 19 impact on business ) होतो. अनेकांचे रोजगार ठप्प होतात. त्याचा जनजीवनावर परिणाम होतो. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्यांना लागण झाल्याची शक्यता वाटते, अशा लोकांनी घराबाहेर पडू नये. मात्र, उद्योग आणि रोजगारासाठी आवश्यक नियमावली आम्ही लवकरच जाहीर करीत आहोत. नियमावलीच्या आधारे उद्योग कसे सुरू राहतील आणि रोजगारावर त्याचा कसा परिणाम होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. मात्र, साथ आटोक्यात आणायची असेल तर निर्बंध लावावे लागतील. ते उद्योगालाही निर्बंध लावावे लागतील, असे देसाई यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.