मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ मार्चला होणारी पूर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरातून परीक्षार्थिनी संताप व्यक्त केला आणि आयोगाने परीक्षेची दुसरी तारीख जाहीर केली. मात्र, नियोजित परीक्षा पुढे ढकलल्याने छात्र भारती विद्यार्थी संघटनेने एमपीएसी आयोगाच्या त्या प्रसिद्धी पत्रकाची होळी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही दिवसांवर आलेली परीक्षा अचानक पुढे ढकल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निमार्ण झाला आहे. मोठ्या प्रमाणात विध्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते मुंबई कार्यालय (दादर)येथे एकत्र जमले. त्यानंतर त्यांनी एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयावरून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. तसेच आयोगाने काढलेल्या प्रसिद्ध पत्रकाची होळी करण्यात आली.
आतापर्यंत पाच वेळा परीक्षा रद्द-
महाराष्ट्र सरकारने एमपीएससीच्या पूर्व परीक्षा सुरुवातीला रद्द केल्या. त्यानंतर 21 मार्चला घेण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या काळातच आरोग्य सेवाच्या परीक्षा, रेल्वेच्या परीक्षा झाल्या. असे असताना राज्य सेवेच्या परीक्षा का वेळेत होत नाहीत. आयोगाच्या निर्णयामुळे परीक्षार्थिंची मोठी भ्रमनिराश झाली आहे. आतापर्यंत पाच वेळा परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया छात्र भारती संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी दिली.