मुंबई - BJP Vs Shiv Sena हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपने एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर ( Eknath Shinde ) आरोपांची धार तीव्र ( BJP criticizes Shiv Sena ) केली आहे. शिवसेनेला कोडींत पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या या राजकीय धुमश्चक्रीत भाजप मात्र तोंडघशी पडताना दिसून येत आहे.
भाजप तोंडघशी - महाविकास विकास आघाडीची ( Mahavikas Vikas Aghadi ) सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडले, ( BJP criticizes Shiv Sena for leaving Hindutva ) अशी टीका करत भाजपने सळो की पळो करुन सोडले. भाजपला चोख प्रत्युत्तर देताना, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची ( Shiv Sena party chief Uddhav Thackeray ) दमछाक झाली. अडीच वर्ष शिवसेना, भाजप असा वाद रंगला होता. मनसेच्या राज ठाकरेंनी भाजपला अप्रत्यक्ष साथ ( Raj Thackeray supports BJP ) देत, शिवसेनेची डोकेदूखी वाढवली. हा वाद रंगला असतानाच भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार फोडून महाराष्ट्रात मिशन लोटस ऑपरेशन ( Mission Lotus Operation in Maharashtra ) यशस्वी केले. राज्यात त्यानंतर सत्तांतर घडवून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ( Chief Minister Eknath Shinde ) तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) पदी विराजमान झाले. सत्तेवर येताच शिंदेंनी थेट शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ही संधी साधून भाजप शिवसेनेला धारेवर धरण्यासाठी विविध प्रकरण बाहेर काढत आरोपांचा भडीमार सुरु केला आहे. मात्र, शिवसेनेकडून आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देताना संबंधित प्रकरणाची दाखले देत असल्याने हे आरोप भाजपवरच बुमरॅंग होत असल्याचे दिसून येत आहे.
मेमन प्रकरण अंगाशी - शिवसेना नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमन याचा भाऊ रऊफ मेमन यांच्यासोबत बैठक घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. भाजपने या व्हिडीओचे भांडवल केले. मात्र बैठकीत माजी आमदार राज पुरोहीत यांचे चिरंजीव माजी नगरसेवक आकाश पुरोहीत देखील दिसून आले. भाजपने त्यानंतर चुप्पी साधली. शिवसेनेने ही संधी साधत भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रऊफ मेमन यांचा सत्कार केल्याचे फोटो व्हायरल केले. शिवसेनेला टार्गेट करणे भाजपच्या अंगाशी आले.
दहशतवादी याकूब मेमन कबर - मुंबईतील १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी याकूब मेमन याच्या बडा कब्रस्तान येथील कबरीवर सजावट केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. भाजप नेत्यांनी दहशतवादी मेमनच्या कबरी वरुन शिवसेनेवर गंभीर आरोप केले. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात चौथरा बांधला, असा आरोप राजकारण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दहशतवाद्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊ नये, असा नियम असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नातेवाईकांना का दिला, असा पलटवार शिवसेनेच्या नेत्यांनी करत भाजपची बोलती बंद झाली.
टिपू सुलतान वाद - मालाड येथील क्रिडांगणाला दिलेल्या टिपू सुलतान नावावरून मुंबईत मोठे राजकारण रंगले. भाजपचे नेत्यांनी शिवसेनेविरोधात यावरुन राळ उठवली. आंदोलन देखील केले. मात्र, मुंबई महापालिकेत नामकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता, त्यावेळी भाजपने सभागृहात कशी संमती दर्शवली, असा सवाल शिवसेना आणि कॉंग्रेसने उपस्थित करत भाजपची दुटप्पी भूमिका उजेडात आणली.