मुंबई राज्यात नाट्यमय सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले व मंत्रिमंडळ विस्तारासहित आता पहिल्या टप्याचे खातेवाटप सुद्धा झालेले आहे या खाते वाटपामध्ये महत्त्वाची खाती आपल्याकडे घेतल्यानंतर आता भाजपाने BJP MLC विधानपरिषदेतमध्येही निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सभागृहाच्या सभापती Legislative Council Speaker post पदावर आपल्या पक्षाचा नेता असावा यासाठी हालचाली सुरुवात केल्या आहेत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन Monsoon session उद्यापासून सुरू होत आहे
विधानसभा अध्यक्ष व सभापती पदही भाजपाकडे : विधानसभा अध्यक्ष पदावर भाजपाचे नेते, आमदार राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतीपद निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडत भाजपाने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने राज्याची सत्ता काबीज केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना जरी मुख्यमंत्रीपद देण्यात आले असले तरीसुद्धा विधानसभा अध्यक्ष पदासह मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती व त्याचबरोबर आता सभापती पदासाठी सुद्धा भाजपाने रणनीती आखली आहे.
सभापती पदासाठी राम शिंदेंचे नाव आघाडीवर : विधानपरिषद विरोधीपक्ष नेतेपदी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अंबादास दानवे हे विरोधीपक्ष नेते झाले असले तरी सुद्धा आता विधान परिषद सभापती पद आपल्याकडे घेण्यासाठी भाजपा पूर्ण तयार झाली आहे. महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्यासाठी भाजपाने विधान परिषदेतील सभापती पदाकडे लक्ष केंद्रित केले आहे. या पदासाठी विधानपरिषद आमदार, माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव भाजपामध्ये आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
विधान परिषदेतील सध्याचे संख्याबळ : विधानपरिषदेत एकूण ७८ सदस्य असतात. सद्यस्थितीत या सभागृहात भाजपाकडे २४ तर शिवसेनेकडे ११ आणि राष्ट्रवादी व काँग्रेसकडे प्रत्येकी १० जागा आहेत. १६ जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त १२ जागांचाही समावेश आहे. राज्यात शिंदे-फडवणीस गटाची सत्ता असल्याने या १२ जागांवर मंत्रिमंडळांने सुचवलेल्या नावावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून लवकरच शिकामोर्तब केले जाऊ शकते. साहजिकच भाजपाचे संख्याबळ वाढून ३६ वर पोहोचेल, तसेच रासपचा एक आणि अपक्ष आमदाराच्या जोरावर भाजपाची एकूण संख्या ३८ पर्यंत जाऊ शकते. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र आले तरी त्यांची संख्या ३२ पर्यंत जाऊ शकते. शेकाप आणि अन्य काही पक्षांनी महाविकास आघाडीला साथ दिली तरी त्यांच्याकडे जास्तीत जास्त ३६ आमदार होऊ शकतात.
हेही वाचा - Rupali Patil Vs Fadnavis पंतप्रधानांच्या आवाहना नुसार फडणवीस राजीनामा देणार का