ETV Bharat / city

शीना बोरा प्रकरणात नवा ट्विस्ट.. शीना जिवंत असल्याचे सांगणारी 'ती' महिला सीबीआय समोर जवाब देण्यास तयार

शीना बोरा हत्याकांडात नवा ट्विस्ट आला आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणील महत्त्वाचं नाव असलेल्या इंद्राणी मुखर्जीने पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. शीना जिवंत असून ती सध्या काश्मीरमध्ये आहे. शीना जिवंत आहे हे सांगण्यासाठी इंद्राणी मुखर्जीने CBI ला एक पत्र पाठवत शीनाचा काश्मीरमध्ये शोध घेण्याची विनंती केली होती. आता ती महिला CBI समोर जबाब देण्यासाठी तयार असल्याचे वकीलांनी सांगितले आहे.

इंद्राणी मुखर्जी
इंद्राणी मुखर्जी
author img

By

Published : Dec 22, 2021, 9:10 PM IST

मुंबई - शीना बोरा हत्याकांडात नवा ट्विस्ट आला आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणील महत्त्वाचं नाव असलेल्या इंद्राणी मुखर्जीने पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. शीना जिवंत असून ती सध्या काश्मीरमध्ये आहे. शीना जिवंत आहे हे सांगण्यासाठी इंद्राणी मुखर्जीने CBI ला एक पत्र पाठवत शीनाचा काश्मीरमध्ये शोध घेण्याची विनंती केली होती. आता त्यानंतर इंद्राणी मुखर्जी यांच्या वकील सना आर खान यांनी शीना बोरा प्रकरणात आणखी एक खुलासा केला आहे. शीना बोरा काश्मीरमध्ये एका महिला अधिकाऱ्याला भेटली. शीनाला भेटणारी ती महिला CBI समोर जबाब देण्यासाठी तयार असल्याचे वकीलांनी सांगितले आहे.

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी यांची वकील जेव्हा त्यांना भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा त्यांनी वकील सना यांना ही माहिती दिली. त्या म्हणाल्या 24 जूनला एक महिला अधिकारी शीनाला काश्मीरच्या दाललेक जवळ भेटली. शीनाला भेटलेली ती महिला CBI समोर जबाब देण्यासाठी तयार आहे. शीना बोरा काश्मीरमध्ये असून तिचा शोध घेण्यासाठी आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मी CBI कडे अर्ज दाखल करणार असल्याचे वकील सना आर खान यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले सांगितले.

  • I've been informed by my client Indrani Mukherjea that a lady officer has informed her that she met Sheena Bora on June 24 near Dal Lake. This officer is ready to record her statement before CBI. We'll file an application to direct CBI to conduct a fair probe: Lawyer Sana R Khan pic.twitter.com/Dwjh9AZ5oP

    — ANI (@ANI) December 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
पत्रात आणखी काय लिहिलंय?
सीबीआय (CBI) संचालकांना लिहिलेल्या पत्रात इंद्राणीने म्हटलंय की नुकतीच मी तुरुंगात एका महिलेला भेटले जिने तिला सांगितलं की ती काश्मीरमध्ये मी शीना बोराला भेटली होती. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना शीना बोराचा काश्मीरमध्ये शोध घ्यावा, अशी मागणी इंद्राणीने केली आहे. इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून ती २०१५ पासून मुंबईच्या भायखळा कारागृहात बंद आहे.
इंद्राणी सर्वोच्च न्यायालयात जाणार?
इंद्राणी मुखर्जीनं जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र गेल्याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यामुळे इंद्राणी आता जामिनासाठी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.
फॉरेन्सिक रिपोर्ट काय म्हणतो?
एम्सच्या फॉरेन्सिक विभागानं तयार केलेल्या या अहवालानुसार २०१५ साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सीबीआयच्या चार्जशीटसोबत जोडलेला वैद्यकीय चाचणी अहवाल हा सापडलेल्या सापळ्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतरच तयार करण्यात आला आहे. उंची, वय, लिंग या सर्व बाबी तो सापळा शीना बोराचाच असल्याचं स्पष्ट करणाऱ्या होत्या. 23 वर्षीय शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली होती, असंही अहवालात नमूद केलं आहे. वेगवेगळ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचं मत, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, आरोपीचा कबुलीजबाब, पुरावे या सगळ्यांच्या आधारे शीना बोराची हत्या झाल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं होतं.
काय आहे प्रकरण -
इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.