ETV Bharat / city

Tipu Sultan Sports Complex Name : शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर का? राम कदम यांचा सवाल

author img

By

Published : Jan 26, 2022, 4:57 PM IST

टिपू सुलतानच्या ( Tipu Sultan Sports Complex ) नावावरून मुंबईत पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड येथील एका क्रीडांगणाला टीपू सुलतान नाव दिल्यामुळे भाजप आणि शिवसेना आमने सामने आले आहेत.

राम कदम
Ram Kadam

मुंबई - मालाड येथील एका उद्यानाला टिपू सुलतान ( Tipu Sultan Sports Complex ) यांचे नाव द्यायचं ठरल आहे. यावरून आता शिवसेना व भाजपा यांच्यात खडाजंगी रंगली असताना शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा या नावावरून आक्रमक झालेले आहेत. त्यातच भाजपा नेते आमदार राम कदम यांनी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर का उतरतात, असा प्रश्न भाजपा आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

राम कदम यांची शिवसेनेवर टीका

शिवसैनिकांना रस्त्यावर उतरायची गरज काय?

भाजपा आमदार राम कदम यांनी सांगितलं आहे, की टिपू सुलतान यांच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मालाड येथील उद्यानाला ( sports complex in Mumbai ) देण्यात यावं. परंतु राज्यात शिवसेनेच सरकार असताना विशेष करून मुख्यमंत्री शिवसेनेचे असतानासुद्धा शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तेसुद्धा टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करता आहेत. मुख्यमंत्री यांनी ठरवलं ते दोन मिनिटांमध्ये हे करू शकतात व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यात उतरायची गरज पडणार नाही. परंतु सत्तेच्या मोहापोटी ते असं करण्यापासून दूर राहतात, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. शिवसेना लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे व छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानही करत आहे, असेही राम कदम यांनी म्हटलं आहे. टिपू सुलतान यांच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यायला अडचण काय आहे? असा प्रश्नही राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे नावाचा वाद?

मालाड येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यात आलं आहे. या उद्यानाचं उद्घाटन पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते होणार आहे. त्याला भाजपाने जोरदार विरोध केला आहे. टिपू सुलतानने हिंदूंचा छळ केला. अशा हिंदूद्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव मालाडमधील उद्यानाला देण्याचा घाट मालाडचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी अनधिकृतपणे घातला आहे. महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये ‘वीर टिपू सुलतान उद्याने’ उभी राहत आहेत. यावरून सत्तेसाठी शिवसेना ‘लाचारसेना’ झाली असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे का?

उद्यान महाराष्ट्र शासनाचे, कार्यक्रम मुंबईच्या पालकमंत्र्यांचा? नामकरणाचा कुठलाही ठराव नाही? नामकरणाला कोणाचीही मान्यता नाही, मग हे नामकरण कसे होते आहे? ही मोगलाई आहे काय? हिंदूंची कत्तल करणाऱ्यांचा उदोउदो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान्य आहे काय? की, ते मतांच्या लाचारीसाठी चिडीचूप आहेत काय? असा सवाल स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Sanjay Raut on Opposition : 'मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे राज्यात उत्साह, तर मुख्यमंत्र्यावर टीका करणारे नामर्द'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.