ETV Bharat / city

Pune Gangrape Case : आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यसरकार प्रयत्न करणार - नवाब मलिक

पुण्यात मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाती आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Nawab Malik
Nawab Malik
author img

By

Published : Sep 7, 2021, 5:12 PM IST

मुंबई - पुण्यात मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा आम्ही निषेध करत असून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. विरोधी पक्ष राज्यात मुली सुरक्षित नाहीत, असे बोलून राजकारण करत आहेत. मात्र, आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे, हे पहावे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

'जो कुणी कुकर्म करेल, त्याला सोडणार नाही' -

जे भाजपा राज्य सरकारवर आरोप लावत आहेत, त्यांच्या खासदार, आमदारांनी व नेत्यांनी केलेले कुकर्म आठवावे. सेंगर, उन्नाव सारख्या व उत्तरप्रदेशमध्ये अशा अनेक घटना त्याकडे लक्ष द्यावे आणि मग अशाप्रकारचे आरोप करावे, असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारचे जो कुणी कुकर्म करेल, त्याला सोडण्यात येणार नाही, असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित ११ लोकांना अटक झाली असून त्यांच्यावर लवकरात लवकर आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

अपहण करुन 13 जणांनी केला बलात्कार -

पुणे रेल्वे स्थानकावरून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर 13 जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघकीस आली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. तर याच प्रकरणातील आणखी पाच आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा- जळगाव जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस; नद्या, नाल्यांना पूर... पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.