ETV Bharat / city

कोविड लस उत्पादनासाठी हापकिन इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा- मुख्यमंत्री - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परळ येथील हापकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली व प्रयोगशाळेची पाहणी केली. दरम्यान, कोरोना लसींच्या निर्मितीसाठी बोलणी सुरू असून येत्या काही दिवसांत राज्य सरकार लसींची निर्मिती करेल, असा आशावाद त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

कोविड लस उत्पादनासाठी हापकीन इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा- मुख्यमंत्री

author img

By

Published : Mar 20, 2021, 6:35 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे लसीकरणाची मोहीम तीव्र केली आहे. मात्र यापुढेही वेगवेगळ्या आजारांवरील लसींबाबत संशोधन करण्यावर भर द्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर कोविड लस उत्पादनासाठी राज्यातील हापकिन इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परळ येथील हापकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली व प्रयोगशाळेची पाहणी केली. दरम्यान, कोरोना लसींच्या निर्मितीसाठी बोलणी सुरू असून येत्या काही दिवसांत राज्य सरकार लसींची निर्मिती करेल, असा आशावाद त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

कोविड लस उत्पादनासाठी हापकीन इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा- मुख्यमंत्री
येत्या काही दिवसांत लसींचा पुरवठा करू-
उद्धव ठाकरे म्हणाले, नंदुरबार येथील दुर्गम भागातील लसीकरण केंद्राला भेट दिली. वाढत्या रुग्ण संख्येनुसार लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही याबाबत चर्चा केली. तसेच लसीच्या उत्पादनासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत. त्याची पूर्तता लवकरच केली जाईल. लस बनवणाऱ्या इतर कंपन्या आहेत. त्यांच्याशीही बोलणी सुरू असून राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेत सातत्याने संशोधन कसे सुरू राहील, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न असतील. मोठ्या प्रमाणात जास्त उत्पादन झाल्यास येत्या काही दिवसात आपण फील आणि फिनिश स्वरूपात म्हणजेच बल्प मध्ये लसीचा पुरवठा करू, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
लसीचा पुरवठा वाढवावा लागेल-
मला राजकारण करायचं नाही. आपल्याकडे १३ कोटी जनता आहे. त्यानुसार २४ कोटी लसींची आवश्यकता आहे. राज्याला मोठ्या प्रमाणात लस मिळावी, अशी मागणी आहे. केंद्र सरकारनेही मागणीनुसार वर्गवारी करून पुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे. मात्र कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी लसींचा पुरवठा वाढवावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक मदत घ्यावी-
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षाप्रमाणे आतादेखील संसर्ग रोखण्यासाठी अतिशय काटेकोरपणे पावले उचलली जात आहेत. येत्या काही दिवसात महाराष्ट्रत लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे हापकीन संस्थेचे स्वतःचे 'जैव वैद्यकीय संशोधन केंद्र' स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने आर्थिक मदत करावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हापकिनकडे १३० कोटी लस निर्मितीची क्षमता-

परळ येथील हाफकीन संस्थेत प्रयोगशाळा उभारण्यासाठी उपलब्ध असणारी जमीन, लस तयार करण्यासाठी आवश्यक असणारा खर्च, तज्ञ मनुष्यबळाची तरतूद या सगळ्या बाबी आहेत. हापकिनमार्फत एप्रिल २०२१ ते २०२२ पर्यंत अंदाजे १३० कोटी लस निर्माण करण्याची क्षमता आहे. भारत बायोटेकशिवाय इतर लस तयार करणाऱ्या उत्पादकांबरोबरही प्राथमिक बोलणी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा- दत्तात्रय होसबळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सहकार्यवाह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.