ETV Bharat / city

मनसुख हिरेन प्रकरणावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर.. - मनसुख हिरेन प्रकरणावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्ष

मोहन डेलकर आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून विरोधक-सत्ताधारी वेलमध्ये आमने-सामने दिसले. वेलमध्ये उतरत दोन्ही बाजूच्या आमदारांनी समोरासमोर येत एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.

state-government-and-center-crisis
state-government-and-center-crisis
author img

By

Published : Mar 9, 2021, 3:47 PM IST

ठाणे - मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी एटीएसला दिलेल्या तक्रारीमध्ये धक्कादायक खुलासा केला असून अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेली स्कॉर्पियो गाडी ही सचिन वझे चार महिन्यांपासून वापरत असल्याचे म्हटले आहे. वझे व धनजंय गावडे यांचा संपर्क मनसुख यांच्याशी होता. सचिन वझे यांनी माझ्या पतीला तू या जिलेटिन प्रकरणात अटक हो, मी तुला लवकरच जामीनावर बाहेर काढेन, असे सांगितल्याचे हिरेन यांच्या पत्नीने एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यासोबत माझ्या पतीचा खून झाला असून तो सचिन वझे यांनी केला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.

मोहन डेलकर आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून विरोधक-सत्ताधारी वेलमध्ये आमने-सामने दिसले. वेलमध्ये उतरत दोन्ही बाजूच्या आमदारांनी समोरासमोर येत एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे आधी 10 मिनिटे आणि नंतर अर्धा तास विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

सचिन वझे यांना अटक करा - फडणवीस
हे ही वाचा - पालघर जिल्हापरिषदेतील १५ तर जिल्ह्यातील चार पंचायत समितीतील १४ सदस्यांची पदे रद्द

सचिन वझे यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. वझेंना तातडीने निलंबित केले पाहिजे. त्यांना पुरावे नष्ट करण्याची मुभा तुम्ही देत आहात. केवळ एका पक्षात प्रवेश केला म्हणून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सचिन वझेंना आधी निलंबित करा. वझेंना पुन्हा कसे नियुक्त करून घेतले. एवढे पुरावे देऊनही तुम्ही त्यांना पाठिशी घालत असाल तर मला तुमच्यावरच शंका येते. फडणवीसांचा थेट गृहमंत्र्यांवर हल्ला.

अनिल देशमुखांचे सभागृहात निवेदन -

22 फेब्रुवारीला मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. ते सात वेळा खासदार होते. त्यांनी सुसाईट नोट लिहिली आहे. त्यात प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांना वारंवार त्रास दिला जात होता. सामाजिक जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रफुल्ल पटेल हे प्रसारक आहेत आधी ते गुजरातमध्ये गृहमंत्री होते.

हे ही वाचा - मुंबई-नाशिक महामार्गावरील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग
त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे, की मी मुंबईत आत्महत्या करत आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाराष्ट्र शासन यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय महाराष्ट्रात मिळेल असा उल्लेख केला आहे. पत्नी कालबेन डेलकर आणि चिरंजीव अभिनव डेलकर यांनी देखील मला पत्र लिहिलं असून त्यांनी ही प्रफुल पटेल यांच्यावर आरोप केले आहेत. मोहन डेलकर यांना महाराष्ट्रात येऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जात आहे. मध्यप्रदेशचे आयएसआय अधिकारी राजेश कुमार श्रीवास्तव यांनी नागपूरमध्ये आत्महत्या केली त्यांचा देखील तोच उद्धेश असावा, असं माझं मत आहे. एटीएसकडून तपास केला जात आहे. निष्पक्ष तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देशमुख यांनी दिले.

तपास एनआयएकडे सोपविण्यामागे निश्चितच काळंबेरं - मुख्यमंत्री

अंबानीच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहविभागाकडून हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "याचा तपास एटीएसकडे दिलेला आहे. या व्यतिरिक्त तपास एनआयकडे देण्याचा केंद्राचा डाव असेल तर यात नक्कीच काळंबेरं आहे.

केंद्रीय गृहविभागाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, यापूर्वीच हा तपास गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. आमचा आमच्या यंत्रणांवर विश्वास आहे. या व्यतिरिक्त हा या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा केंद्राचा विचार असेल तर नक्कीच यात काही काळंबेरं आहे. आम्ही सुद्धा तपासातून ते उघड करणार आहोत.

हे ही वाचा - 'यांची कोरोनासोबत बैठक झालीय का?'

नाना पटोले -फडणवीसांमध्ये खडाजंगी -

विरोधी पक्षनेत्यांकडे सीडीआर कुठून आला. हा सीडीआर मिळविण्याचा अधिकार त्यांना आहे का याची विचारणा केली पाहिजे असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला. नाना पटोलेंचा फडणवीसांवर थेट आरोप केला त्यानंतर फडणवीस यांनी म्हटले की, सीडीआर मी मिळविला, माझी चौकशी करा असे आव्हान पटोलेंना दिले. सभागृहात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही आम्हाला धमकी देता काय? विधानसभेत फडणवीस, देशमुख आणि नाना पटोलेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.