मुंबई - राज्यात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. हा व्यवसाय सावरत असताना कोरोनाचे संकट उभे राहिलेले आहे. यामुळे दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत आहे. याचा दूध उत्पादकांना मोठा फटका बसत असून त्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे रोज दहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
कोरोनामुळे राज्यात दूधाचा खप घटलेला आहे, त्यामुळे रोज दहा लाख लिटर दुधाची पावडर तयार करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला असल्याने याचा मोठा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात प्रत्येक दिवशी उत्पादित होत असलेल्या १२ लाख लीटरपैकी तब्बल १० लाख लिटर दूध हे अतिरिक्त ठरत होते. त्यामुळे बाजारभावही घसरल्याने सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.