ETV Bharat / city

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही 27 ऑगस्टपासून सुरू करावी - राज्य निवडणूक आयोग

author img

By

Published : Aug 26, 2021, 9:29 AM IST

राज्यातील बहुतांश महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढच्या वर्षी हाेणार असून निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही 27 ऑगस्टपासून सुरू करावी आणि आराखडा तयार होताच ई-मेलद्वारे निवडणूक आयोगाला अवगत करावा, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

मंत्रालय
मंत्रालय

मुंबई - राज्यातील बहुतांश महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढच्या वर्षी हाेणार असून निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही 27 ऑगस्टपासून सुरू करावी आणि आराखडा तयार होताच ई-मेलद्वारे निवडणूक आयोगाला अवगत करावा. त्यामुळे प्रत्यक्ष प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून देता येईल, असे आदेश निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील सर्व पालिका आयुक्तांना दिले आहेत.

ward structure plan maharashtra
पत्र

हेही वाचा - अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा-अतुल भातखळकर

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी - निजामपूर, पनवेल, मिरा - भाईंदर, पिंपरी - चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड - वाघाळ, अमरावती, अकोला, चंद्रपूर, नागपूर या महानगरपालिकांची मुदत संपण्यापूर्वी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कारवाही सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिले आहेत. आराखडा तयार करण्याची कार्यवाही 27 ऑगस्ट पासून सुरू करावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

काॅंग्रेसने प्रभागांची पुनर्रचना करण्याची केली होती मागणी

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीत आहेत. मात्र, 2017 मध्ये भाजपने केलेली प्रभागांची पुनर्रचना संशयास्पद असल्याने काॅंग्रेसने प्रभागांची पुनर्रचना करण्याची मागणी राज्य निवडणूक आयाेगाकडे केली हाेती. त्या मागणीची दखल घेत निवडणूक आयाेगाने प्रभागांच्या पुनर्रचनेबाबत संकेत दिले होते, आता त्याबाबत आदेश दिले आहेत.

भाजपचा प्रभाग पुनर्रचनेला विराेध

प्रभागांच्या पुनर्रचनेची मागणी करून काॅंग्रेसने भाजपसमाेर नवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भाजपने या प्रभाग पुनर्रचनेला विराेध केला आहे. सन 2017 मध्ये भाजपचे सरकार होते. यावेळी सरकारने पालिकेच्या 227 जागांची पुनर्रचना करताना पदाचा गैरवापर करून आपल्या सोयीप्रमाणे जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने पुनर्रचना केली. यात आपल्या पक्षाला कसा फायदा होईल, याकडे पाहिले. त्यामुळे, भाजपला 40 ते 50 जागा अधिक मिळाल्या. ही बाब नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरुद्ध होती. तेव्हा काही नागरिकांनी हरकती आणि सूचनांमार्फत या पुनर्रचनेला विरोध केला. मात्र, त्यांना न्याय देण्यात आला नाही. भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी केलेल्या 45 प्रभागांच्या पुनर्रचनेत सुधारणा करून ही चूक दुरुस्त करावी, अशी मागणी काँग्रेसचे पालिकेतील विराेधी पक्षनेते रवी राजा यांनी निवडणूक आयाेगाकडे केली हाेती. त्यांच्या मागणीची दखल घेत राज्य निवडणूक आयाेगाने त्यांना पत्र पाठवून प्रभागांच्या फेररचना करण्याबाबत कळविले होते. आता आयोगाने त्याबाबत आदेश दिले आहेत.

हेही वाचा - राणे हे 'नॉर्मल' मनुष्य नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले, भाजपने शहाणे व्हावे; सामनातून सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.