ETV Bharat / city

ST Workers Strike : लालपरीच्या कर्मचाऱ्यांचा एल्गार; राज्यातील २४० एसटी आगार बंद! - ETV BHARAT LIVE

राज्यातील २५० एसटी डेपोपैकी २४० डेपो बंद ठेवले होते. कुर्ला - नेहरूनगर, उरण, परेल, लांजा, देवरुख, खेड, गारगोटी, कागल, गडहिंग्लज आणि इगतपुरी हेच दहा डेपो सुरु होते. दिवाळी सण साजरा करून शहराकडे येणाऱ्या नागरिकांची या संपामुळे प्रचंड हाल झाले आहे.

ST
ST
author img

By

Published : Nov 8, 2021, 7:18 PM IST

मुंबई - एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेनेही या संपात भाग घेतला. राज्यात आज (सोमवारी) दिवसभरात २५० आगारांपैकी २४० आगार बंद ठेवत संपाला बिनशर्त पाठिंबा दिला. प्रवाशांना याचा फटका बसला असून प्रंचड यातना सोसव्या लागल्या. खासगी वाहतूकदारांनी मात्र यात चांगलेच हात धूऊन घेतले.

राज्यातील २४० आगार बंद -
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ताची मागणी मान्य झाल्याने कृती समितीने २८ऑक्टोबर रात्रीपासून उपाेषण मागे घेतले. परंतु विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचाऱ्यांंनी संप सुरुच ठेवला आहे. कृती समितीतील २३ कामगार संघटनांनी विलीनीकरणाच्या मागणीला पाठिंबा दिला असला तरी २२ संघटना संपात सहभागी झाल्या नाहीत. संघर्ष एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना यांनी ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारण्याची नोटीस दिली. संपामुळे दिवाळीच्या सुट्टीत महामंडळाच्या सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात बुधावरी आव्हान दिले. या याचिकेवर गुरुवारी रात्री सुनावणी झाली असता संघटनांनी संप मागे घेण्याचे निर्देश न्यायालयाने कामगार संघटनाला दिले आहे. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत संप सुरुच ठेवला आहे. या संपला आज १२ दिवसपूर्ण झाले असून कर्मचाऱ्यांनी स्वतःहून राज्यातील २५० आगारांपैकी २४० आगार बंद ठेवत संपाला बिनशर्त पाठिंबा दिला.

हेही वाचा - ST Workers Strike : सोलापुरातील संपूर्ण एसटी सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल

दहा आगार सुरु-
एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संप चिघळला असून राज्यात काम बंद हाेत असलेल्या डेपाेंच्या संख्येत दिवसाला वाढ हाेत आहे. शनिवारी एसटीचे तब्बल ६५ डेपाे आणि रविवारी १२७ डेपो बंद राहिले आहे. राज्यातील २५० एसटी डेपोपैकी २४० डेपो बंद ठेवले होते. कुर्ला - नेहरूनगर, उरण, परेल, लांजा, देवरुख, खेड, गारगोटी, कागल, गडहिंग्लज आणि इगतपुरी हेच दहा डेपो सुरु होते. दिवाळी सण साजरा करून शहराकडे येणाऱ्या नागरिकांची या संपामुळे प्रचंड हाल झाले आहे.

प्रवासी बसेसचा प्रतीक्षेत-
पुणे आणि स्वारगेट वरून मुंबईला येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल सुरु आहेत. मुंबईकडे सुटणाऱ्या हिरकणी एसटी बंद असल्याने इतर गाड्यांमधील गर्दी वाढली आहे. खासगी वाहतुकदारांकडून वाट्टेल तेवढे दर आकारले जात आहेत. सलग सुट्टी संपल्यानंतर मुंबई गाठण्यासाठी पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाकड, चांदणी चौक अशा विविध एसटी थांब्यांवर तासन तास प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत दिसत आहेत.याच्या फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी मात्र यात चांगलेच हात धूऊन घेतले.

हेही वाचा - जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार; महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.