ETV Bharat / city

ST Workers Strike : एसटी संपातून भाजपची माघार, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी - Sadabhau Khot

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्याबाबतची घोषणा परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब ( Anil Parab ) यांनी दिली. त्यानंतर आमदार खोत ( Sadabhau Khot ) व पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी आज (दि. 25) सरकारने काही मागण्या पूर्ण केल्या ही बाब स्वागतार्ह असून विलिनीकरणाचा लढा सुरुच राहणार असल्याचे म्हणत भाजपकडून आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देत असल्याची घोषणा केली. भाजपने अंग काढून घेतल्यामुळे आंदोलकांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.

ST Workers
एसटी कर्मचारी
author img

By

Published : Nov 25, 2021, 5:09 PM IST

Updated : Nov 25, 2021, 5:22 PM IST

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्याबाबतची घोषणा परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब ( Anil Parab ) यांनी दिली. त्यानंतर आमदार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) व गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी आज (दि. 25) सरकारने काही मागण्या पूर्ण केल्या ही बाब स्वागतार्ह असून विलिनीकरणाचा लढा सुरुच राहणार असल्याचे म्हणाले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा केली. दुसरीकडे आंदोलकांची बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलन ( ST Workers Strike ) सुरुच राहणार असल्याचे जाहीर केले. भाजपने आंदोलनातून अंग काढून घेतल्यामुळे आंदोलकांनी ( ST Workers ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. 'मोदी तेरी लाठी चले, भारत माता जय बोले', अशा घोषणा एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या.

घोषणबाजी करताना एसटी कर्मचारी

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासह इतर मागण्यांसाठी गेले दोन आठवडे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला भाजपने पूर्ण पाठिंबा दिला होता. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे आंदोलनाचे नेतृत्व करत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर नेहमीच आझाद मैदानात येऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. या संपूर्ण आंदोलना दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकार व विशेष करून परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात होती. काल (बुधवारी) परिवहन मंत्री परब, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत तसेच आंदोलनकर्त्यांच्या मध्ये चर्चा झाली. यावेळी कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्यावर तसेच न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने विलीनीकरण करण्याची शिफारस केल्यास त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्र्यांनी जाहीर केले.

अशी होणार पगारवाढ ..?

चालकसेवा कालावधीसध्याचे वेतनसुधारित वेतनएकूण वाढ
नवनियुक्त17 हजार 39524 हजर 5957 हजार 200
10 वर्षे पूर्ण23 हजार 4028 हजार 8005 हजार 760
20 वर्षे पूर्ण37 हजार 44041 हजार 403 हजार 600
30 वर्षे पूर्ण53 हजार 28056 हजार 8803 हजार 600

वाहकसेवा कालावधीसध्याचे वेतनसुधारित वेतनएकूण वाढ
नवनियुक्त16 हजार 9923 हजार 2997 हजार 200
10 वर्षे पूर्ण21 हजार 60027 हजार 3605 हजार 760
20 वर्षे पूर्ण36 हजार39 हजार 6003 हजार 600
30 वर्षे पूर्ण51 हजार 84055 हजार 4003 हजार 600

यांत्रिकीसेवा कालावधीसध्याचे वेतनसुधारित वेतनएकूण

10 वर्षे पूर्ण30 हजार 24036 हजार5 हजार 760
20 वर्षे पूर्ण44 हजार 49648 हजार 963 हजार 600
30 वर्षे पूर्ण57 हजार 31260 हजार 9123 हजार 600

लिपीकसेवा कालावधीसध्याचे वेतनसुधारित वेतनएकूण
नवनियुक्त17 हजार 72624 हजार 9267 हजार 200
10 वर्षे पूर्ण24 हजार 76830 हजार 5285 हजार 760
20 वर्षे पूर्ण38 हजार 16041 हजार 7603 हजार 600

हे ही वाचा - ‘कामावर हजर व्हा अन्यथा...’; एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा 24 तासांचा अल्टीमेटम

Last Updated : Nov 25, 2021, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.