ETV Bharat / city

ST Wroker Protest : एसटी कर्मचाऱ्यांचे शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन; परबांच्या बंगल्याबाहेर सुरक्षेत वाढ - अनिल परब घराबाहेर सुरक्षेत वाढ

एसटी कर्मचारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर परबांच्या अजिंक्यतारा या शासकीय बंगल्याबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली ( Anil Parab House Security Increased ) आहे.

Anil Parab House Security Increased
Anil Parab House Security Increased
author img

By

Published : Apr 8, 2022, 5:06 PM IST

Updated : Apr 8, 2022, 6:02 PM IST

मुंबई - राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केले ( St Worker Protest Sharad Pawar House ) आहे. यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्यानंतर आता एसटी कर्मचारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर परबांच्या अजिंक्यतारा या शासकीय बंगल्याबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली ( Anil Parab House Security Increased ) आहे.

दुपारी पावणे चार वाजल्याच्या सुमारास एसटीचे कर्मचारी अचानक पणे शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवास्थानी आले. यावेळी आंदोलनकांनी घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. अचानक कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाल्याने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

अनिल परब यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या घराबाहेर आल्या. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शांततेचे आवाहन केले. मात्र, एसटी कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत नजिकच्या पोलीस ठाण्यात नेलं आहे. त्यानंतर आता सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी अनिल परब यांच्या शासकीय बंगल्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा - ST Worker Agitation : सिल्व्हर ओकवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांसमोर सुप्रिया सुळेंनी जोडले हात, म्हणाल्या..

Last Updated : Apr 8, 2022, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.