ETV Bharat / city

NCP tweet Shrikant Shinde Photo : श्रीकांत शिंदे सुपर सीएम झालेत का? राष्ट्रवादीकडून फोटो ट्विट - Ravikant Varpe tweet

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा कारभार त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे ( MP Shrikant Shinde ) हे चालवतात का? असा प्रश्न उपस्थित करणारा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविकांत वर्पे यांनी ट्विट ( Ravikant Varpe tweet ) केला आहे.

Photo Tweet from NCP
राष्ट्रवादीकडून फोटो ट्विट
author img

By

Published : Sep 23, 2022, 1:12 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा कारभार त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे ( MP Shrikant Shinde ) हे चालवतात का? असा प्रश्न उपस्थित करणारा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविकांत वर्पे यांनी ट्विट ( Ravikant Varpe tweet ) केला आहे. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजारीत चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. असा कसा धर्मवीर? असा सवाल रविकांत वर्पे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून विचारला असून, या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे खुर्चीवर बसले आहेत. खुर्चीच्या मागे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असा शासकीय फलक दिसतोय. या फोटोच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविकांत वर्पे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री, राज्य सरकारला हा सवाल विचारला आहे.

Ravikant Varpe tweet
रविकांत वर्पे यांचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशा आशयाचे ट्विट केल्यानंतर अद्याप तरी एकनाथ शिंदे गट किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतचे स्पष्टीकरण आलेलं नाही. याआधी ही एकनाथ शिंदे हे केवळ नावापुरते मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राज्याची जबाबदारी सांभाळतात अशा प्रकारची टीका सातत्याने विरोधी पक्षाकडून केले जातेय. त्यातच श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो ट्विट करत राष्ट्रवादी आता खासदार श्रीकांत शिंदे यांनाच सुपर सीएम असल्याचा नवीन आरोप केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.