ETV Bharat / city

Floor Test Result : महाविकास आघाडीला शंभरीही गाठता आली नाही; दरवाजे बंद झाल्याने 'हे' आमदार राहिले गैरहजर

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारची आज विधानभवनात बहुमत चाचणी पार पडत आहे. या बहुमत चाचणीला काँग्रेसचे अशोक चव्हाण, (Ashok Chavan) विजय वडेट्टीवार हे नेते उशीरा पोहोचले आहेत. त्यामुळे या दोघांनाही मतदान करता आले नाही. मात्र याचा एकनाथ शिंदे गटाला मोठा फायदा झाला आहे.

Eknath Shinde Gov Floor Test
विधानभवन
author img

By

Published : Jul 4, 2022, 11:44 AM IST

Updated : Jul 4, 2022, 3:08 PM IST

मुंबई : शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत चाचणीत १६४ मते घेतली. दुसरीकडे, महाविकास आघाडीला यावेळी शंभरीही गाठता आली नाही. विशेष म्हणजे काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह तब्बल दहा आमदार बहुमत चाचणीवेळी अनुपस्थित राहीले. त्यांना यायला उशीर झाला. यातच दरवाजे बंद झाल्यामुळे त्यांना उपस्थित राहता आले नाही असे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि नगरचे आमदार संग्राम जगताप हेही आज अनुपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारची एकूण दहा मते कमी झाली आहेत. काल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे मत नव्हते. आज त्यांची गणना झाली

विधानभवनात कोणते नेते पोहोचले उशीरा - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज सरकारची बहुमत चाचणी होत आहे. मात्र बहुमत चाचणीला उशीरा पोहोचल्याने अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार सदनात जाता आले नाही. त्यांच्या जाण्यापूर्वीच सदनाचे दरवाजे बंद करण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत. त्यामुळे आता चाचणी झाल्यानंतरच हे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. दरवाजे बंद झाल्याने काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, झिशान सिद्धीकी, धिरज देशमुख या आमदारांना सभागृहात जाता आले नाही. त्यामुळे तब्बल सहा नेत्यांना उशीर झाल्यामुळे मतदान करता आले नाही.

उशीर झाल्यामुळे आदित्य ठाकरेही बालंबाल बचावले - एकीकडे काँग्रेसह इतर पक्षांच्या नेत्यांना मतदान करण्यासाठी सभागृहात जाता आले नाही. अनेक नेते अगदी शेवटच्या मिनीटाला सभागृहात पोहोचले. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे देखील सभागृह बंद होण्याच्या शेवटच्या मिनीटाला पोहोचले. त्यामुळे आदित्य ठाकरे हे देखील मतदानापासून वंचित राहिले असते.

Last Updated : Jul 4, 2022, 3:08 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.