ETV Bharat / city

आपल्याच चक्रव्युहात अडकले नाना पटोले: राष्ट्रवादी, सेनेकडून सुरू आहे टीकेचा भडीमार - नाना पटोले शरद पवार वाद लेटेस्ट बातमी

लोणावळा येथील कार्यकर्त्यांच्या सभेत केला आहे. मी कुठे जातो, कुणाला भेटतो, काय करतो याबाबत संपूर्ण माहिती पोलिसांमार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिली जात असल्याचे त्यांनी सांगून खळबळ उडवून दिली. मी स्वबळाचा नारा दिल्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. पटोले यांच्या या आरोपाने आता मात्र आरोपांच्या फैरी झडत आहेत.

Nana Patole
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Jul 14, 2021, 1:57 PM IST

Updated : Jul 15, 2021, 11:03 AM IST

मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा लावून राजकारणात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. पटोले यांच्या या वक्तव्यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. आपल्यावर अजित पावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाळत ठेवत असल्याचे पटोले यांनी वक्तव्य करुन आघाडीत बिघाडी झाल्याचे उघड झाले. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी, शिवसेनेने खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पटोले यांची खिल्ली उडवली. तर खुद्द शरद पवार यांनी नाना पटोलेसारख्या लहान माणसावर मी बोलणार नसल्याचे सांगत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची अवकळा काढली. त्यामुळे नाना पटोले आपल्या चक्रव्युहात फसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अशी पडली आघाडीत वादाची "ठिणगी" . . .

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष भविष्यात सर्वच निवडणुका एकत्र लढतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 10 जूनला केले सांगितले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्याने व्यथित झालेल्या नाना पटोले यांनी अकोल्याच्या कार्यक्रमात 'मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मी जाहीर करेन. दुसऱ्यांना आमच्या पक्षाची भूमीका जाहीर करता येणार नाही. त्यामुळे शरद पवार नेमके काय बोलले आणि त्यामागील त्यांची भूमिका काय हे माहीत नाही. काँग्रेसने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे, असेही नाना पटोले म्हणाले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल, असे जाहीर केले. पटोले यांनी स्वबळाची भाषा करुन थेट शरद पवार यांनाच आव्हान दिल्याने आघाडीत खळबळ उडाली. येथूनच राष्ट्रवादी आणि पर्यायाने शरद आणि नाना पटोले यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली.

काय आहे संजय राऊत आणि नाना पटोलेंचा वाद . . .

यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भूषविले आहे. आता मात्र देशात वेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे मत संजय राऊत यांनी मांडले होते. त्यांच्या या वक्तव्याचा नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेना हा यूपीएचा घटकपक्ष नाही, त्यामुळे त्यांना याबाबत बोलण्याचा अधिकार नसल्याचे म्हणत पटोले यांनी संजय राऊतांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली होती. संजय राऊत हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत का, असा सवालही पटोले यांनी पत्रकार परिषदेत विचारला होता. त्यामुळे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या चांगल्याच फैरी झडल्या. शिवसेनेच्या मुखपत्रातून बुधवारी संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या पायाखालची सरकली वाळू . . .

राज्यात काँग्रेस पक्ष बळकट होत असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामार्फत माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी लोणावळा येथील कार्यकर्त्यांच्या सभेत केला आहे. मी कुठे जातो, कुणाला भेटतो, काय करतो याबाबत संपूर्ण माहिती पोलिसांमार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिली जात असल्याचे त्यांनी सांगून खळबळ उडवून दिली. मी स्वबळाचा नारा दिल्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे उघड झाले. त्यानंतर मात्र राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते नाना पटोले यांच्यावर तुटून पडले. त्यामुळे नाना पटोले यांनी आपल्या या वक्तव्यावरुन घुमजाव केले. आपल्या वक्तव्याचा भाजपने विपर्यास केल्याचा राग पटोले यांनी आळवला.

नाना पटोलेंनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचे विरोधकांवर फोडले खापर . .

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे बोलून खळबळ उडवून दिली. मात्र त्यानंतर लगेच आपल्या वक्तव्यापासून घुमजाव केले. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हणत याचे सगळे खापर पटोलेंनी विरोधकांवर फोडले. यावेळी त्यांनी फोन टॅपींगचे जुने प्रकरण उकरुन काढले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या आरोपामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांना कापरं भरल्याची प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांच्या घरी पार पडली काँग्रेस नेत्यांची बैठकीत नाना पटोलेंना डावलले

आगामी निवडणुकीत काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनवण्यासाठी नाना पटोले यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे पटोले वारंवार स्वबळाची भाषा करत राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनाही लक्ष्य करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याने शरद पवार पुढे सरसावले आहेत. पवार यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी तुम्ही खरच एकटे लढणार आहात का असा सवाल काँग्रेस नेत्यांना विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या बैठकीला नाना पटोले यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे मुंबईत पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीला आपल्याला निमंत्रण नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस पक्षासोबत 2014 च्या निवडणुकीत झालेल्या धोक्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण स्वबळाची तयारी करत आसल्याचे स्पष्ट केले आहे.

तर आम्ही स्वबळावर जेवायला येऊ . . .

मंगळवारी जलभूषण पुरस्कार सन्मान सोहळ्यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी स्वबळावरुन पटोलेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. 'बाळासाहेब थोरात यांनी करोनाची भीती न बाळगता आम्हाला जेवण्यासाठी बोलवावे. आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, अशा शब्दात पटोले यांचे नाव न घेता कान टोचले. तसेच माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका नाहीतर उद्या जेवणावरुन आघाडीत बिघाडी असे व्हायचे. पण तसे काही नाही,' असे स्पष्टीकरणही ठाकरेंनी दिले.

स्वबळाच्या नाऱ्यामुळे नाना पटोले यांच्यावर राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनी टीकेचा भडीमार सुरू केला. मात्र वरिष्ठ पातळीवरुन त्यांच्या या वक्तव्यावर कोणत्याही नेत्यांनी भाष्य केले नाही. त्यामुळे पटोले यांना वरिष्ठ नेत्यांचे अभय असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी नाना पटोले यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. नाना पटोले यांनी आपल्याच वादग्रस्त वक्तव्याने चक्रव्युह तयार केले आहे. त्यांना या चक्रव्युहात अडकवण्यासाठी एकीकडे शरद पवार यांच्यासारखा तेल लावून बसलेले पहेलवान आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसह त्यांचे संजय राऊतांसारखे चाणक्य आहेत. आता नाना पटोले हे चक्रव्यूह भेदणार की, आपल्याच चक्रव्युहात फसून पद गमावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Last Updated : Jul 15, 2021, 11:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.