ETV Bharat / city

Vinayak Damodar Savarkar: थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदू धर्मातील सात बंदीच्या बेड्या तोडणारे पहिले नेते - स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिकच्या भगूर येथे झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. लहानग्या सावरकरांनी चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आल्याचे वृत्त समजताच आपल्या कुलदेवी आई भगवती पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा सेतू उभारुन 'मारिता-मारिता मरेतो झुंजेन' अशी शपथ घेतली.

Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
author img

By

Published : May 28, 2022, 1:38 PM IST

मुंबई - थोर क्रांतिकारक, कवी, लेखक, नाटककार आणि हिंदू सभेचे पहिले नेते म्हणून वि. दा सावरकर हे इतिहासाला सुपरिचित आहेत. सावरकरांनी आपल्या साहित्यातून हिंदू धर्माबाबतचे त्यांचे विचार वेळोवेळी प्रतिपादित केले आहेत. ब्रिटिशांविरोधातील कारवायांमुळे त्यांना दोन वेळा जन्मठेप झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी सामाजिक रुढी परंपरांविरोधात मोठे काम केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती, त्यानिमित्त ईटीव्ही भारतने घेतलेल्या त्यांच्या कार्याचा हा आढावा खास आमच्या वाचकांसाठी.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म आणि शिक्षण - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिकच्या भगूर येथे झाला होता. आईचे नाव राधाबाई सावरकर आणि वडिलांचे नाव दामोदरपंत सावरकर होते. दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे अपत्य होते. ते अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांचे थोरले बंधू बाबाराव आणि त्यांची पत्नी येसूवहिनी यांनी केला. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना यांवर त्यांचे प्रभुत्व होते. लहानग्या सावरकरांनी चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आल्याचे वृत्त समजताच आपल्या कुलदेवी आई भगवती पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा सेतू उभारून मारिता-मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेतली. मार्च १९०१ मध्ये यमुनाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

पॅरिसहून येताना अटक - लंडनला गेल्यानंतर सावरकरांनी पागे आणि म्हसकर या आपल्या साथीदारांच्या साहायाने एक गुप्त संघटना स्थापन केली. मित्रमेळा असे या संघटनेचे नाव होते. येथील इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू करुन जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. पॅरिसहून लंडनला येताना सावरकरांना अटक झाली. पुढील खटला भारतात चालवला जावा म्हणून भारतात येताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात समुद्रात उडी घेतली. तो प्रयत्न त्यांचा अयशस्वी ठरला. अखेर ब्रिटिश सरकारने त्यांना पुन्हा अटक करून भारतात आणले.

हिंदू धर्मातील जातीच्या तोडल्या बेड्या - अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत आणले. येथे त्यांनी हिंदूंच्या समाजाला संघटित करण्यासाठी अनेक कार्य केले. रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास पाचशे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केली. हिंदू समाजातील सात बेड्या तोडण्याचे काम सावरकरांनी केले. स्पर्श बंदी, रोटी बंदी, बेटी बंदी, व्यवसाय बंदी, सिंधू बंदी, दत्त बंदी, शुद्धी बंदी अशा अनेक रूढी आणि परंपरा मोडल्या. अनेक आंतरजातीय विवाह देखील सावरकरांनी लावले.

आचार्य अत्रेंकडून स्वातंत्र्यवीर उपाधी - सावरकरांनी भाषाशुद्धीचे काम मोठ्या प्रमाणावर केले. दिनांक, क्रमांक, बोलपट, वेशभूषा, दिग्दर्शक, चित्रपट, मध्यंतर, उपस्थित, नगरपालिका, महानगरपालिका, महापौर, पर्यवेक्षक विश्वस्त, गणसंख्या, स्तंभ, मूल्य, शुल्क, हुतात्मा, निर्बंध, शरणागती, विशेषांक, सर्वमत, धरणे, नभोवाणी, दूरदर्शन ,दूरध्वनी, अर्थसंकल्प, क्रीडांगण, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, परीक्षक, शस्त्रसंधी, टपाल, तारण, संचलन, गतिमान, नेतृत्व, सेवानिवृत्ती, वेतन, असे अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेसाठी दिले. सावरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उपाधी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली होती. आज त्यांची जयंती त्यानिमित्त त्यांना ईटीव्ही भारतकडून मानाचा मुजरा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.