ETV Bharat / city

VIDEO : समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करणारे वकील कनिष्क जयंत यांच्याशी खास मुलाखात.. - समीर वानखेडे गंभीर आरोप वकील कनिष्क जयंत

आर्यन खान प्रकरणाला रोज नव वळण मिळताना दिसत आहे. आता ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी थेट समीर वानखेडेंसह सहा जणांवर अपहरण आणि खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जयंत यांनी तसा तक्रार अर्जच पोलिसांना दिला आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advocate Kanishk Jayant react on Sameer Wankhede
समीर वानखेडे खंडणी वसुली आरोप वकील जयंत
author img

By

Published : Oct 25, 2021, 5:48 PM IST

Updated : Oct 25, 2021, 9:58 PM IST

मुंबई - आर्यन खान प्रकरणाला रोज नव वळण मिळताना दिसत आहे. आता ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी थेट समीर वानखेडेंसह सहा जणांवर अपहरण आणि खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जयंत यांनी तसा तक्रार अर्जच पोलिसांना दिला आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माहिती देताना वकील कनिष्क जयंत

हेही वाचा - समीर वानखेडे प्रकरण: वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री-गृहमंत्री यांच्यात बैठक

अॅड. कनिष्क जयंत यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली की, आर्यन खान क्रुझ प्रकरणातील मी एक तक्रारदार आहे. 12 आणि 16 ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात केपी गोसावी, मनिष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतिक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात मी तक्रार दिली आहे. या लोकांनी संघटीतपणे एकत्र येऊन कट कारस्थान करून आर्यन खानचे अपहरण केले आणि कोट्यावधी रुपयांची खंडणी त्याच्या सुपरस्टार वडिलांकडून मागितली, अशा स्वरुपाचा लेखी तक्रार अर्ज मी दाखल केला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची या सर्व प्रकरणात भूमिका महत्त्वाची आहे. या पाचही लोकांना वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. एका प्रकारे फिल्म इंडस्ट्रीवर दबाव आणण्यासाठी अधिकाराचा गैरवापर करण्यात आला आहे, अशा स्वरुपाची तक्रार करण्यात आल्याचे जयंत यांनी सांगितले.

माता रमाबाई पोलीस ठाणे, यलोगेट पोलीस ठाणे व स्वत: मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे, समीर वानखडेसह अन्य जणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे खंडणीचेच रॅकेट

या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी एक व्हिडिओ जारी करून या प्रकरणाची पोलखोल केली आहे. समीर वानखेडे, किरण गोसावींवर साईल यांनी खंडणीचे आरोप केले आहेत. या व्हिडिओत कुणाला किती रक्कम मिळणार होती, याची डिटेल्सही देण्यात आली आहे. यावरून समीर वानखेडे खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे जयंत यांनी म्हटले.

साईल यांचे आरोप काय?

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसोझाचे मी फोनवरील संभाषण ऐकले होते. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचे साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला.

त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितले. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच, मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असेही प्रभाकर साईलनी सांगितले. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच, 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आले. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली.

हेही वाचा - विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांकडून ७७ कोटींचा दंड वसूल

Last Updated : Oct 25, 2021, 9:58 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.