ETV Bharat / city

पोर्नोग्राफिक प्रकरण: राज कुंद्राने दीड वर्षात बनवले शंभर पॉर्न सिनेमा ? - पोर्नोग्राफिक प्रकरण

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने अंधेरी पश्चिम येथील राज कुंद्राच्या वियान ऑफिसवर धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांनी सगळा डेटा मिळविला आहे. हा सर्व डेटा टीबीमध्ये आहे.

राज कुंद्रा
राज कुंद्रा
author img

By

Published : Jul 23, 2021, 1:15 AM IST

Updated : Jul 23, 2021, 2:01 AM IST

मुंबई -अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यवसायिक राज कुंद्रा याच्या अटकेनंतर पोर्नोग्राफी गुन्ह्यातील रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुत्राच्या माहितीनुसार राज कुंद्राने मागील दीड वर्षात 100 हून अधिक पॉर्न सिनेमा बनविले आहेत. त्यामधून त्याची कोट्यवधी रुपयांची कमाई झाली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा याला अटक केली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात कुंद्रा अटकेत आहे. 23 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच काळात पोलिसांनी राज कुंद्रा याच्याशी निगडित असणाऱ्या ठिकाणांवर धाडी टाकले आहेत. या धाड सत्रात काही थक्क करणारे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचे कळते.

हेही वाचा-राज कुंद्राने माझे फोटोज आणि व्हीडिओज बेकायदेशीररित्या वापरले - पूनम पांडे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पॉर्नोग्राफी प्रकरणात मागच्या दीड वर्षात राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने 100 पेक्षा जास्त अश्लील सिनेमे बनवले आहेत. यामधून त्याला कोट्यवधी रुपयांची कमाईदेखील झाली आहे.

हेही वाचा-पोर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्रा आणि शर्लिन चोप्रामध्ये झाला होता करार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने अंधेरी पश्चिम येथील राज कुंद्राच्या वियान ऑफिसवर धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांनी सगळा डेटा मिळविला आहे. हा सर्व डेटा टीबीमध्ये आहे. काही डेटा डिलीट झाल्याचे देखील कळते आह. पोलीस डिलीट झालेला डेटा फॉरेन्सिक डिपारमेंटच्या मदतीने मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा-राज कुंद्राचे नाव पुराव्यांच्या साखळीत, आता तपास यंत्रणेने ते योग्य पद्धतीने जोडायला हवे - अॅड. निकम

काय आहे पोर्नोग्राफी प्रकरण

मुंबईचे पोलीस आयुक्ताच्या माहितीनुसार राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. त्याच्याविरोधात गुन्हे शाखेकडे पुरेसे पुरावे आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मुंबईत अश्लील सिनेमा व चित्रफित बनवले जात असून ते मोबाईल ॲपद्वारे प्रदर्शित केली जात होते. याप्रकरणी गुन्हे शाखा तपास करत होती. त्याच बरोबर याप्रकरणी राज कुंद्राचीही चौकशी करण्यात आली होती. सगळ्या प्रकरणाचे कुंद्रा मुख्य सूत्रधार आहेत, असे पुराव्यांनिशी दिसून येत आहे. त्यामुळे त्याला अटक केल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले. यापूर्वीही राज कुंद्राची पोलिसांनी विविध प्रकरणात चौकशी केली होती.

Last Updated : Jul 23, 2021, 2:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.