ETV Bharat / city

Sonia Gandhi CM Discussion : सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री यांच्यात फोनवरून 15 मिनिटे चर्चा - Sonia Gandhi CM Discussion

महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असूनही काँग्रेस मंत्र्यांची आणि आमदारांची कामे होत नसल्याचे बोलले ( Congress leaders complaint to high command ) जात आहे. आमदारांना तसेच काँग्रेस मंत्र्यांना निधी दिला जात नसल्याची तक्रार काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गुरुवारी (17 फेब्रुवारी रोजी) केली होती. अर्थमंत्री अजित पवार काँग्रेसच्या मंत्र्यांना, आमदारांना जाणून-बुजून निधी देत नाही. त्यामुळे काँग्रेस मंत्र्यांना आणि आमदारांना ( Congress MLA fund issue in Maharashtra ) आपली कामे पार पडता येत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सोनिया गांधी उद्धव ठाकरे चर्चा
सोनिया गांधी उद्धव ठाकरे चर्चा
author img

By

Published : Feb 18, 2022, 5:12 PM IST

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi Discussion with CM Thackeray ) यांच्यामध्ये फोनवरून वीस मिनिटे चर्चा झाली. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री यांना फोन करून राज्याची स्थिती तसेच सरकारमध्ये सामील असलेल्या काँग्रेसच्या मंत्री आणि नेत्यांच्या अडचणीबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या काँग्रेस नेत्यांना मिळणाऱ्या निधीबाबत ( Funding to congress Ministers ) यावेळी चर्चा झाल्याची सांगण्यात येत आहे.

काँग्रेस नेत्यांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट
महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असूनही काँग्रेस मंत्र्यांची आणि आमदारांची कामे होत नसल्याचे बोलले ( Congress leaders complaint to high command ) जात आहे. आमदारांना तसेच काँग्रेस मंत्र्यांना निधी दिला जात नसल्याची तक्रार काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गुरुवारी (17 फेब्रुवारी रोजी) केली होती. अर्थमंत्री अजित पवार काँग्रेसच्या मंत्र्यांना, आमदारांना जाणून-बुजून निधी देत नाही. त्यामुळे काँग्रेस मंत्र्यांना आणि आमदारांना ( Congress MLA fund issue in Maharashtra ) आपली कामे पार पडता येत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हेही वाचा-Congress Leaders Meet CM Thackeray : निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - नाना पटोले

काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

काँग्रेस मंत्र्यांना आणि आमदारांना निधी वेळेत आणि योग्य निधी मिळावा ही मागणी घेऊन काँग्रेसचे मंत्री, आमदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांची गुरुवारी भेट ( Nana Patole meet CM Maharashtra ) घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. यापुढे काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते.

हेही वाचा-Problem Of Congress Ministers : महाविकास आघाडी सरकार मध्ये काँग्रेस मंत्र्यांची घुसमट?

राजकीय परिस्थितीबाबत सोनिया गांधी व मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा-

मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर याबाबतची सगळी माहिती अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात आली. त्यानंतर सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी 20 मिनिटे चर्चा केली आहे. काँग्रेसने त्यांच्या अडचणी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही राज्यात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली.

हेही वाचा- Fund to Tribal Development : आदिवासी विकास विभागाला निधीची कमतरता - मंत्री के. सी. पाडवी यांची नाराजी

निधीची कमतरता असल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची नाराजी

आदिवासी विभागाला निधीची कमतरता आहे. याबाबद खुद्द राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी ( Minister K C Padvis displeasure over less fund ) यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. आणखीन एका कॉंग्रेस मंत्र्यांच्या निधी कमतरतेबाबतच्या नाराजीचे पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणे मांडले आहे. हायकमांडला सर्व बाबीबाबत सूचित केले असल्याचे मंत्री के. सी. पाडवी यांनी सांगितले आहे.

ठोस पावले उचलली जात नसल्याची उर्जा मंत्र्यांनी केली होती खंत
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष असला तरी, काँग्रेसला सरकारमध्ये फारसे महत्त्व दिले जात नाही. खास करून निधी वाटपाबाबत काँग्रेसची गळचेपी होतेय. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या खात्याबाबत होणाऱ्या दुर्लक्षा कडे लक्ष वेधले. ऊर्जा विभागाचा थेट राज्यातील सामान्य नागरिकांशी संबंध येतो. मात्र ऊर्जा विभागाची सध्या असलेली परिस्थिती फार बिकट असून, राज्यामध्ये सामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची पाळी आल्यास त्याचा थेट फटका महाविकास आघाडी सरकारला बसेल. यासोबतच काँग्रेस बद्दलही जनतेमध्ये रोष निर्माण होईल आश्या आशयाचे पत्र नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.