ETV Bharat / city

माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली - ज्ञानदेव वानखेडे - समीर वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडेंचा खुलासा

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जातीचा दाखला प्रसारमाध्यमांना दाखविला. समीर आणि पहिल्या पत्नीत कायदेशीर घटस्फोट झाल्याचेही ते म्हणाले. कायदेशीर कागदपत्रांमध्ये ज्ञानदेव वानखेडे अशीच नोंद आहे. माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली आहे असेही ते म्हणाले.

माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली - ज्ञानदेव वानखेडे

author img

By

Published : Oct 27, 2021, 12:52 PM IST

Updated : Oct 27, 2021, 1:32 PM IST

मुंबई : समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जातीचा दाखला प्रसारमाध्यमांना दाखविला. या दाखल्यावर समीर ज्ञानदेव वानखेडे असे नाव असल्याचा उल्लेख असल्याचे ज्ञानदेव वानखेडेंनी सांगितले. यावेळी नवाब मलिक यांच्या आरोपाचे खंडन करत त्यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचे ते म्हणाले. समीर आणि पहिल्या पत्नीत कायदेशीर घटस्फोट झाल्याचेही ते म्हणाले. कायदेशीर कागदपत्रांमध्ये ज्ञानदेव वानखेडे अशीच नोंद आहे. माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली आहे असेही ते म्हणाले.

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी आपली धार्मिक ओळख लपवल्याच्या आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांनी केला होता. ज्ञानदेव वानखेडे यांनी याला प्रत्युत्तर देताना, कायदेशीर कागदपत्रांमध्ये ज्ञानदेव असाच उल्लेख असल्याचे स्पष्टीकरण दिले. मलिक यांच्याकडून नावात छेडछाड केल्याचा आरोपही ज्ञानदेव यांनी पत्रकार परिषदेत केला.

मलिक यांच्याकडून नावात छेडछाड?
धार्मिक ओळख लपवून नोकरी लाटल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करताना समीर वानखेडे यांच्या लग्नाची कागदपत्रे प्रसिद्ध केली होती. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याची कागदपत्रेही त्यांनी जाहीर केली होती. समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांच्या आरोपाचे खंडन केले. एखाद्याला लाडाने मुन्ना, चुन्ना अशी हाक मारली जाते. माझ्या पत्नीचे नातेवाईक किंवा अन्य कोणीतरी मला प्रेमाने दाऊद हाक मारत असावेत असा दावा ज्ञानदेव यांनी केला. तसेच कोणीही मला काहीही हाक मारत असो, पण मी मागासवर्गीय आहे. कागदपत्रांमध्येही माझे नाव ज्ञानदेव आहे. मग माझा मुलगा समीर मुस्लीम कसा होऊ शकतो? असेही ते म्हणाले. फेसबुकवर दाऊद वानखेडे या नावाने प्रोफाईल बनवले आहे. त्याबद्दल माहिती नाही, परंतु मलिक यांच्याकडून छेडछाड झाल्याचा संशय ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटले. लवकरच समीरचा खरा जन्मदाखला सादर करु, असा दावाही त्यांनी केला.

कायदेशीर घटस्फोट
समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील छायाचित्र नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर शेअर केले. डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत त्यांचा निकाह झाला होता. या निकाहनाम्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख होता. मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा. अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर समीरला सही करायला लावली, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले. डॉ. शबाना कुरेशी आणि समीर यांच्यात आता कायदेशीर घटस्फोट झाल्याचे ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.

Last Updated : Oct 27, 2021, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.