ETV Bharat / city

Kinnara Maa Organization Mumbai : उपेक्षित किन्नर समाजाचा गरजूंना मदतीचा हात! - किन्नर समाजाचा गरजूंना मदतीचा हात

किन्नर समाजाने ( Kinnara Society ) एकत्रित येऊन 'किन्नर माँ' या ( Kinnara Maa organization Mumbai ) संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाजा सोबतच इतर गरीब आणि ( Kinnara Maa organization Helping the poor ) गरजू नागरिकांसाठी हात पुढे केला आहे. कोविड सारख्या अत्यंत वाईट परिस्थिती ही 'किन्नर माँ' संस्थेने सर्वसामान्य आणि गरीब, गरजू माणसांच्या गरजा ओळखात त्यांच्यापर्यंत वस्तू आणि अन्नधान्य पोचवण्याचे काम केले आहे.

किन्नर बांधव
किन्नर बांधव
author img

By

Published : May 20, 2022, 6:40 PM IST

Updated : May 20, 2022, 6:56 PM IST

मुंबई - किन्नर समाज तसा नेहमीच उपेक्षित राहिला. आपल्या मूलभूत अधिकारांसाठी देखील एक मोठी लढाई या समाजाला लढावी लागली. आपले स्वतःचे नातेवाईक आणि समाजाकडून मिळणारी हिणतेची वागणुकीमुळे या समाजाला नेहमीच हाल-अपेष्टा वाट्याला आले आहेत. मात्र अशी पार्श्वभूमी असताना देखील या समाजाने लोकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. किन्नर समाजाने ( Kinnara Society ) एकत्रित येऊन 'किन्नर माँ' या ( Kinnara Maa organization Mumbai ) संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाजा सोबतच इतर गरीब आणि ( Kinnara Maa organization Helping the poor ) गरजू नागरिकांसाठी हात पुढे केला आहे. कोविड सारख्या अत्यंत वाईट परिस्थिती ही 'किन्नर माँ' संस्थेने सर्वसामान्य आणि गरीब, गरजू माणसांच्या गरजा ओळखात त्यांच्यापर्यंत वस्तू आणि अन्नधान्य पोचवण्याचे काम केले आहे. अजूनही मुंबईसारख्या अनेक ठिकाणी गरज भासते तेव्हा सामान्य मुंबईकरांना त्यांच्याकडून मदतीचा हात दिला जातो. केवळ अन्नधान्याच नाही तर, आरोग्यविषयक मदतही या संस्थेच्या मार्फत करण्यात येते.

प्रतिक्रिया देताना किन्नर माँ संस्थेचे पदाधिकारी

अशी स्थापन झाली किन्नर माँ संस्था : 1995 साली मुंबईतील काही किन्नर समाजातील लोकांनी एकत्र येत किन्नर माँ संस्थेची स्थापना केली असल्याची संस्थेच्या अध्यक्षा सलमा खान सांगतात. जगताना भोगलेला यातना मेल्यानंतर तरी किन्नर समाजाला भोगाव्या लागू नयेत, यासाठी या संस्थेची निर्मिती झाली. किन्नर समाजाच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार व्हावेत. त्यांचे मृतदेह कुजत, सडत पडू नयेत. यासाठी सुरुवातीला या संस्थेने पुढाकार घेत किन्नर समाजातील व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी उचलली होती. मात्र या संस्थेत राज्यभरातून किन्नर समाजातील लोक जोडली गेली. आता जवळपास पाच हजार सदस्य या संस्थेसाठी काम करत असून, किन्नर समाजासोबत इतर गरजू लोकांना मदत करण्यासाठी ही संस्था नेहमी तत्पर असते. या संस्थेच्या माध्यमातून किन्नर समाजातील व्यक्तीला शिक्षित करण्याचा प्रयत्नही केला जातो. संस्थेचे अनेक सदस्य उच्चशिक्षित आहेत. मुंबईतील विक्रोळी परिसरात आपल्या संस्थेचे एक छोटसे कार्यालय या संस्थेने थाटले आहे. या कार्यालयातूनच अनेक उपक्रम ही संस्था राबवत आहे. मुंबई, नवी मुंबई, आणि दिल्ली येथे देखील या संस्थेचे कार्यालय असून राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरातही कार्यालय सुरू केली जाणार आहेत.

जोपासली जाते सामाजिक बांधिलकी : किन्नर समाजकडून अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी मेडिकल कॅम्प लावला जातो. येथे किन्नर समाजासोबत इतर गरीब व गरजू नागरिकांचे देखील उपचार केले जातात. तसेच प्रत्येक महिन्याला विधवा महिलांना संस्थेकडून रेशन पुरवले जाते. तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही अन्नधान्य तसेच औषध उपचारांसाठी मदत केली जाते.

सरकारकडून नेहमीच उपेक्षा : केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांकडून नेहमीच या समाजाला उपेक्षा मिळाली आहे. कोणत्याही ठोस योजना या समाजासाठी सरकारने केल्या नसल्याची खंत संस्थेचे अध्यक्ष सलमा खान व्यक्त करतात. राज्य सरकारकडून सध्या मुंबईत 'गरिमा गृह' हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गरिमा गृहात केवळ 25 ट्रांसजेंडर व्यक्तीने ठेवले जाते. मात्र या योजनेचा फायदा अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. केवळ महाराष्ट्रात जवळपास एक लाख ट्रांसजेंडर असल्याने प्रत्येक जिल्ह्यात ट्रांसजेंडर व्यक्तींसाठी एक आश्रम सुरू करण्याची मागणीही या संस्थेकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - OMICRON BA4 : ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा भारतात प्रवेश.. 'या' ठिकाणी आढळला पहिला रुग्ण

Last Updated : May 20, 2022, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.