ETV Bharat / city

Gunratna Sadavarte Bail Rejected : गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; गिरगाव न्यायालयाने जामीन नाकारला - गुणरत्न सदावर्तेचा जामीन नाकारला

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानावर हल्ल्याप्रकरणी ( Silver Oak Attack Case ) अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गिरगाव न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला ( Gunratna Sadavarte Bail Rejected ) आहे.

Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte
author img

By

Published : Apr 16, 2022, 7:11 PM IST

Updated : Apr 16, 2022, 8:36 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर हल्ल्याप्रकरणी ( Silver Oak Attack Case ) अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदावर्तेंनी गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. हा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला ( Gunratna Sadavarte Bail Rejected ) आहे.

न्यायालयात युक्तीवाद करताना सरकारी वकिलांनी सांगितले की, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. त्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते हे मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, सोमवारी सदावर्ते मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

संदीप गोडबोलेला तीन दिवसांची कोठडी - आंदोलनाच्या दिवशी सदावर्ते हे नागपूर येथील संदीप गोडबोले आणि अजित मगर यांच्या संपर्कात होते. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आंदोलनातील अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संदीप गोडबोले यांत्रिक पदावर - शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी कर्मचारी गोडबोले हे सदावर्ते यांच्या संपर्कात होते. संदीप गोडबोले नागपुरात यांत्रिक पदावर कार्यरत आहेत. नागपुरातील संपर्कातील असलेल्या व्यक्तींपैकी गोडबोले एक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - Aaditya Thackeray Ayodhya Tour : आदित्य ठाकरेंचं 'जय श्रीराम'; 'या' महिन्यात जाणार अयोध्या दौऱ्यावर

Last Updated : Apr 16, 2022, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.