ETV Bharat / city

उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन ठरले व्यर्थ, एकनाथ शिंदे यांना दोन तृतीयांश आमदार फोडण्यात यश? - MLA Yogesh Kadam

शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) हे गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहे. गुलाबराव पाटील यांच्यासोबत आणखी दोन शिवसेनेचे आमदार तिथे गेले आहेत. गुलाबराब पाटील यांच्यासह आमदार योगेश कदम ( MLA Yogesh Kadam ) , मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) हे आमदार ते पोहोचले आहेत.

शिवसेनेचे आमदार
शिवसेनेचे आमदार
author img

By

Published : Jun 23, 2022, 7:27 AM IST

Updated : Jun 23, 2022, 1:48 PM IST

मुंबई- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे गुजरातला रवाना झाले. हे आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत. पक्ष फोडणाऱ्या नेत्यांबाबत शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे.

शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) हे गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहे. गुलाबराव पाटील यांच्यासोबत आणखी दोन शिवसेनेचे आमदार तिथे गेले आहेत. गुलाबराब पाटील यांच्यासह आमदार योगेश कदम ( MLA Yogesh Kadam ) , मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) हे आमदार ते पोहोचले आहेत.

  • #WATCH | Assam: Shiv Sena leader Eknath Shinde along with other MLAs at Radisson Blu Hotel in Guwahati last night, after 4 more MLAs reached the hotel. pic.twitter.com/1uREiDXNr5

    — ANI (@ANI) June 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांचे बंड ही अंतर्गत बाब असल्याची भूमिका घेतली आहे. असे असले तर महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. पक्ष फोडणाऱ्या नेत्यांबाबत शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे.

  • अगर कोई विधायक दल तोड़कर जाता है तो कानून की परवाह किये बिना रस्ते मे कूटो,,,,स्वर्गीय बाला साहब, pic.twitter.com/krSGkLiljb

    — হাসান খান Hasan Khan حسن خان (@HasanAitc) June 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणे गरजेचे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबुक संवादनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट ( Eknath Shinde tweet ) केले आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे, शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, अशा आशयाचे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आहे. शिवाय पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचेही शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे आता महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

मॅजिक फिगर 37 - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना आता पक्षांतर बंदी कायद्याची मात्रा लागू पडणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्याकडे शिवसेनेचे 37 आमदार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी 34 आमदारांच्या सहीचे समर्थनाचे पत्रच जारी केले आहे. त्याचबरोबर आणखी तीन शिवसेना आमदार गुवाहाटीला पोहोचत आहेत. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची मॅजिक फिगर 37 गाठली असल्याचे स्पष्ट होत आहे.

नवीन सरकारचे गणित - राज्यात सध्या 287 एकूण आमदार आहेत. बहुमतासाठी 144 आमदारांची गरज आहे. राज्यात भाजपकडे एकूण 113 आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे 106 आमदार आणि इतर मिळून त्यांचे एकूण संख्याबळ 113 वर जाते. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या फोटोतील आमदारांचा समावेश केल्यास त्यातील एकूण 34 आमदार जोडले तर त्यांची संख्या 147 होते. अर्थातच भाजप या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करु शकते. मात्र एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जर शिवसेनेचे 37 आमदार नसतील तर त्यांचे पक्षांतर बंदी कायद्यानुसार सदस्यत्व रद्द होऊ शकते.

हेही वाचा-खासदार भावना गवळींचे शिवसेना पक्ष प्रमुखांना पत्र.. बंडखोरांवर कारवाई न करण्याची केली विनंती

हेही वाचा-Complaint against Cm Thackeray : कोविड गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार

हेही वाचा-Letter To Governor : एकनाथ शिंदे विधीमंडळ पक्षप्रमुखपदी कायम, बंडखोर आमदारांनी राज्यपालांना लिहिले पत्र

Last Updated : Jun 23, 2022, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.