ETV Bharat / city

Rana Couple vs Shivsena : राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक; शिवसैनिक इमारतीत शिरले

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर पोहचून हनुमान चालीसा वाचणार असल्याचे सांगितले होते. वेळ होऊनही ते मातोश्रीवर न पोहोचल्याने शिवसैनिक त्यांच्या इमारतीत घुसले. तसेच त्यांना बाहेर येण्याचे आवाहन केले आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे.

author img

By

Published : Apr 23, 2022, 9:14 AM IST

Updated : Apr 23, 2022, 11:30 AM IST

Rana Couple vs Shivsena
Rana Couple vs Shivsena

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर पोहचून हनुमान चालीसा वाचणार असल्याचे सांगितले होते. वेळ होऊनही ते मातोश्रीवर न पोहोचल्याने शिवसैनिक त्यांच्या इमारतीत घुसले ( shivsena workers reach in Rana couple building ). तसेच त्यांना बाहेर येण्याचे आवाहन केले आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे.

शिवसेना हिंदुत्व विसरले, हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणारच, असे राणा दाम्पत्याने ( Navneet rana Mumbai House ) आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा मातोश्रीच्या ( Navneet rana Matoshree visit Mumbai ) परिसरात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांची गर्दी वाढत गेली. आक्रमक शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार येथील घराला वेढा घातला. सध्या राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांसोबतच मुंबई पोलिसांचा देखील पहारा आहे. त्यामुळे, मुंबई पोलिसांचे कवच व शिवसैनिकांची नजर चोरून खरंच राणा दाम्पत्य मातोश्रीवर ( Navneet Rana will recite Hanuman Chalisa at Matoshri ) येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - VIDEO : शिवसैनिक आक्रमक, राणा दाम्पत्याच्या इमारतीत बॅरिकेट्स तोडून शिरले; जोरदार घोषणाबाजी

मातोश्रीवर जाणारच - आमदार रवी राणा यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणले आहे की, महाराष्ट्र पोलीस आम्हाला घराबाहेर पडू देत नाहीत. शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही नेहमीच 'मातोश्री'ला मंदिर मानले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र केवळ राजकीय फायदा मिळवत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आम्हाला परेशान करण्याचे, मारण्याचे आदेश दिले आहेत. ते बॅरिकेट्स तोडत आहेत. मी पुन्हा सांगत आहे की, 'मी बाहेर जाईन आणि 'मातृश्री' येथे हनुमान चालिसाचा पाठ करेन'. मुख्यमंत्र्यांनाच फक्त लोकांना तुरुंगात कसे टाकायचे हे कळते असा आरोपही खासदार नवनीत राणा त्यांनी मुंबईतील निवासस्थानी बाेलताना केला आहे.

हेही वाचा - Navneet Rana ON Disput : शिवसैनिक आमच्या घरावर हल्ला करत आहेत, पण मी 'मातोश्री'वर जाणारच - नवनित राणा

Last Updated : Apr 23, 2022, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.