ETV Bharat / city

'फिक्सिंग' झाले तरी सत्यमेव जयतेचाच विजय; 'सामना'तून भाजपवर निशाणा

फडणवीस यांच्याकडे बहुमत होते तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती 'ऑपरेशन लोटस'च्या नावे का केली? असा प्रश्न भाजपला सामनातून विचारण्यात आला आहे. नितीन गडकरी यांनी क्रिकेटच्या खेळाची उपमा या सर्व प्रकाराला दिली, असे म्हणत कितीही 'फिक्सिंग' झाले तरी 'सत्यमेव जयते' या ब्रीदाचा पराभव जुगाऱ्यांना करता येणार नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

samana
सामना
author img

By

Published : Nov 26, 2019, 8:37 AM IST

मुंबई - काळजी नसावी, 'सत्यमेव जयते'चाच विजय होणार असून जुगाऱ्यांना आपण यात मात देऊ, अशी टीका शिवसेनेने मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर केली आहे. सोमवारी रात्री हाॅटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांसह शक्तीप्रदर्शन केले. यावेळी 'आम्ही 162' नारा देत बहुमत महाविकास आघाडीकडेच असल्याचे दाखवून दिले.

'सामना'

फडणवीस यांच्याकडे बहुमत होते तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती 'ऑपरेशन लोटस'च्या नावे का केली? असा प्रश्न भाजपला सामनातून विचारण्यात आला आहे. नितीन गडकरी यांनी क्रिकेटच्या खेळाची उपमा या सर्व प्रकाराला दिली, असे म्हणत कितीही 'फिक्सिंग' झाले तरी 'सत्यमेव जयते' या ब्रीदाचा पराभव जुगाऱ्यांना करता येणार नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध होईल तेव्हा सत्य जिंकल्याचा आनंद महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काळजी नसावी, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा - शहीद हेमंत करकरेंच्या कन्येने पुस्तकातून उलगडले बहुआयामी व्यक्तीमत्व

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा व प्रतिष्ठेचा बाजार सत्ताधाऱ्यांनी मांडला आहे. महाराष्ट्राशी ज्यांचे भावनिक नाते अजिबात नाही असेच लोक शिवरायांच्या महाराष्ट्राच्या इज्जतीची लक्तरे काढू शकतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून 162 आमदारांचे पत्र राजभवनात सादर केले आहे. हे सर्व आमदार राजभवनात राज्यपालांसमोर उभे रहायला तयार आहेत . इतके स्पष्ट चित्र असतानाही राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली? या लोकांनी बनावट कागदपत्रे सादर केली व त्यावर घटनेचे रक्षणकर्ते असलेल्या भगतसिंग नामक राज्यपालांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. मग तीन पक्षांनी सही, शिक्क्यानिशी जे पत्र दिले त्यावर राज्यपालांची भूमिका काय?

दुसऱ्या पक्षांच्या आमदारांचे अपहरण करणे व त्यांनी दुसऱ्या राज्यात नेऊन डांबून ठेवणे ही कसली चाणक्य नीती? अजित पवार यांचा खेळ संपला तेव्हा 'शरद पवार हेच आमचे नेते व मीच राष्ट्रवादीचा पाईक' अशी बतावणी त्यांनी केली. ही पराभूताची मानसिकता आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.