मुंबई - मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे ( Mosque Loudspeaker Controversy ) उतरलेच पाहिजे, याबाबतचा बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ राज ठाकरे ( Raj Thackeray Tweet Balasaheb Thackeray Video ) यांनी ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या व्हिडीओला शिवसेनेनेदेखील ( Shivsena Criticized Raj Thackeray By Balasaheb Video ) व्हिडीओनेच उत्तर दिले आहे. शिवसेनेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असून या व्हिडीओमधून बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहे. राज ठाकरेंच्या व्हिडीओला शिवसेनेकडून आता व्हिडीओतूनच उत्तर दिले असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ पोस्ट - राज ठाकरे यांची विचारसरणी कशी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून वेगळी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधल्या या भाषणातून केला होता. त्याच भाषणाचा काही भाग व्हिडीओद्वारे शिवसेनेकडून आता व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ ट्विट करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्या व्हिडीओला शिवसेनेकडून आता व्हिडीओतूनच उत्तर दिले जात आहे.
राज ठाकरेंनीही केले होते ट्विट - राज्यात ठाकरे सरकार असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार आहे का? शरद पवार यांचे विचार पुढे नेणार? असा सवाल उपस्थित करत बाबासाहेबांच्या भाषणाचा एक व्हिडीओ राज ठाकरे यांनी ट्विट केला होता. या ट्विटमध्ये बाळासाहेब मशिदीवरील भोंगे उतरलेत पाहिजेत याबाबत वक्तव्य करत आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्या व्हिडीओला शिवसेनेकडून व्हिडीओनेच उत्तर दिल्यानंतर आता राज ठाकरे याबाबतचा दुसरा व्हिडीओ ट्विट करणार का, याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेनेकडून पुष्टी नाही - दरम्यान, सोशल मीडियातून व्हायरल होत असलेल्या बाळासाहेबांच्या व्हिडीओबाबत शिवसेनेकडून पुष्टी करण्यात आलेली नाही. तशी अधिकृत भूमिकाही शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली नाही.