ETV Bharat / city

Uday Samant : 'सहनशीलतेचा अंत पाहू नका...', उदय सामंतांचा शिवसैनिकांना धमकीवजा इशारा - उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला

सध्या शिव्या घालणं ही परंपरा झाली असताना हल्ला करणे पर्यंत मजल गेली आहे. विचार बदलला म्हणून काय ठार माराल. आम्ही शांत आहोत, तोपर्यंत ठीक आहे, असा इशारा उदय सामंतांनी शिवसैनिकांना दिला ( shivsena rebel mla uday samant warning shivsainik ) आहे.

mla Uday Samant
mla Uday Samant
author img

By

Published : Aug 3, 2022, 5:16 PM IST

Updated : Aug 3, 2022, 5:45 PM IST

मुंबई - पुण्यात शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर मंगळवारी ( 2 जुलै ) रात्री हल्ला झाला. यामध्ये सामंत यांच्या गाडीचे नुकसान झालं ( uday Samat Car attack in pune ) आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चिघळलं असून, याप्रकरणात दोन जणांना अटकही केली आहे. त्यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या शिव्या घालणं ही परंपरा झाली असताना हल्ला करणे पर्यंत मजल गेली आहे. विचार बदलला म्हणून काय ठार माराल. आम्ही शांत आहोत, तोपर्यंत ठीक आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा थेट इशारा उदय सामंत यांनी शिवसैनिकांना दिला ( shivsena rebel mla uday samant warning shivsainik ) आहे.

आमदार उदय सामंत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'...ठार मारायचा ही महाराष्ट्राची संस्कृती' - प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, पुण्यात मी कोणताही रूट बदलला नाही. मला कॉन्व्हेंट होता. पोलिसांच्या सुरक्षेत निघालो होतो. यावेळी माझ्यावरती हल्ला झाला. हल्ला करणारे व्यासपीठावर उपस्थित होते. हल्लापूर्वीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले असून, यावेळी हत्यार आणण्याचे सांगण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. माझ्यावर हल्ला करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कारवाई करू नका अशी पद्धतीची भूमिका मी घेतली आहे. मात्र, एखाद्याने आपले विचार बदलले म्हणून त्याला ठार मारायचा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पोलीस नसते तर माझ्यावरती बाका प्रसंग ओढवला असता. कोणाची राजकीय कारकीर्द मला उध्वस्त करायची नाही. माझी देखील राजकीय कारकीर्द कोणी उध्वस्त करू नये, असे आवाहन सामंत यांनी केले.

'गद्दार म्हणता आमच्या आई-वडिलांना शिव्या घालता' - एखाद्या आवडत्या नेत्याने गेल्या भाषणानंतर प्रतिक्रिया येणे साहजिकच आहे. मात्र, एखाद्याच्या जीवावर उठणे हे लोकशाहीमध्ये बसत नाही. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता आमच्या आई-वडिलांना शिव्या घालता, आम्ही शांत आहोत. आई- बहिणी विकल्या म्हणता आम्ही शांत आहोत. आम्हीही कोकणातून परशुरामाच्या भूमीतून आलो आहोत. संघर्ष आम्हाला माहित आहे. आक्रमक कार्यकर्ते आमच्याकडेही आहेत. स्वतःचा संरक्षण करू शकतो. तसेच, मतदार संघात ही कार्यकर्ते असून पुढे काय होईल हे सांगता येत नाही, असा धमकीवजा इशारा सामंत यांनी दिला. तुम्हाला आम्ही गद्दार वाटतोय तर स्पष्ट करा, अन्यथा मतदार त्याचा न्यायनिवडा करण्यासाठी आहेतच, असेही सामंत म्हणाले.

'दुसरीकडे आमचे कानफाड फोडण्याचे भाषण ठाकले' - हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील अनेकांना मी राजकारणात आणला आहे. मात्र, दुसरीकडे आमचे कानफाड फोडण्याचे भाषण ठोकले जात आहे. आमच्या 50 जणांचे गाल काय वरती आले आहेत का?. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे.

हेही वाचा - Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरेंचा बंडखोर आमदारांना इशारा; 'शांत बसाव अन्यथा शिवसैनिक...'

Last Updated : Aug 3, 2022, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.