ETV Bharat / city

Sanjay Sirsat संजय शिरसाटांचे शिंदे गटात बंड उद्धव ठाकरेंना संबोधलं कुटुंबप्रमुख - संजय शिरसाट ट्वीट मराठी बातमी

शिंदे भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे त्यामध्ये संजय शिससाटांना स्थान देण्यात आलं नाही मात्र संजय शिरसाटांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या ट्वीटमुळे खळबळ उडाली sanjay sirsat tweet over uddhav thackeray आहे

Sanjay Sirsat eknath shinde
Sanjay Sirsat eknath shinde
author img

By

Published : Aug 13, 2022, 1:16 PM IST

मुंबई शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नाही यामुळे ते नाराज असल्याची अटकळ व्यक्त केली जात आहे त्यातच त्यांनी शुक्रवारी रात्री एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंचा उल्लेख कुटुंबप्रमुख म्हणून करून आपल्यापुढे ठाकरेंच्या गटात परतण्याचा मार्ग अजूनही खुला असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपला समावेश झाला नाही तर आपल्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत हेच त्यांनी या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तातडीने हे ट्विट डिलीट केले पण तोपर्यंत राजकीय वर्तुळात शिंदे गटातील शिरसाटांच्या कथित बंडाविषयी विविध चर्चांना सुरुवात झाली यामुळे शिरसाटांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न sanjay sirsat tweet over uddhav thackeray केला

शिरसाट परतीच्या वाटेवर संजय शिरसाट यांना मंत्रीपदाचे वचन मिळालं होतं का आणि ते वचन पूर्ण झालं नाही म्हणून शिरसाट यांनी ट्विट करत हे संकेत दिले आहेत का असा सवाल त्यांनी ट्विट केल्याने उपस्थित होत आहे तसेच आमदार संजय शिरसाठ परतीच्या वाटेवर आहेत का अशीही शक्यता वर्तवली जात आहे

ट्विटवर स्पष्टीकरण मी उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या भाषणाचे ट्विट केले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखाची भूमिका पार पाडली होती त्यामुळे तुम्ही कुटुंबप्रमुख असाल तर तुम्ही कुटुंबातील सर्वच सदस्यांची भूमिका लक्षात घेतली पाहिजे स्वतःच्या नव्हे तर कुटुंबाच्या भावनांचा विचार केला पाहिजे असे माझं आजही मत आहे आम्ही उद्धव ठाकरेंना कायम कुटुंबप्रमुख मानतो पण त्यांनी आमच्या भावनांचा विचार केला नसल्याने आजची परिस्थिती उद्भवली असे संजय शिरसाट म्हणाले

मंत्रिपदासाठी दबाव नाही ट्विट नंतर त्याची सारवासारव करताना संजय शिरसाट म्हणाले की मी मंत्रिपदासाठी दबाव आणत नाही एखाद्यावर विश्वास ठेवला किंवा एखाद्याला आपले मानले तर त्याच्यासाठी मान कापली गेली तरी हरकत नाही एकनाथ शिंदे जी भूमिका घेतील ती भूमिका आम्हाला मान्य असेल असे संजय शिरसाट म्हणाले मातोश्रीवर पुन्हा जाणार नाही उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलावी त्यांनी भूमिका बदलली नाही यामुळेच शिंदे साहेबांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवून 40 आमदार बाहेर पडले आहेत काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहिलो तर ती आमची राजकीय आत्महत्या ठरली असती यामुळे आम्ही बाहेर पडलो असून शिवसेना म्हणूनच काम करतोय असे ते म्हणाले या माध्यमातून त्यांनी आपण मंत्रिपदासाठी दबाव आणत नसल्याची सारवासारव त्यांनी केली

हेही वाचा Sanjay Raut संजय राऊतांचे तुरुंगात वाचन लिखाण सुरुच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.