मुंबई - मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना नेते आणि आमदार यांच्यासह उद्धव ठाकरे यांनी आघाडीबरोबर सरकार स्थापन करणे याबाबतीत चर्चा केली.
हेही वाचा... राज्यातील २७ महापालिकांमध्ये आज ठरणार महापौर, उपमहापौर
शिवसेना आणि आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येत जर सरकार स्थापन केले, तर किमान समान कार्यक्रम काय असेल, याबाबत तसेच मुख्यमंत्री पदाबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच या बैठकीनंतर आमदारांनी मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, तो अंतिम निर्णय राहील असे सांगितले आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांनी येत्या दोन दिवसात सर्व काही समजेल अशी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा... पवार-ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता
मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. यावेळी आमदारांनी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी बैठकीदरम्यान केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे नावही आघाडीवर असल्याची माहिती आहे.