ETV Bharat / city

Shivsena leaders Slammed Kirit Somaiya : चहावाल्याची लायकी नाही, असे किरीट सोमैय्यांना म्हणायचे का? शिवसेना नेत्यांचा हल्लाबोल - Shivsena leaders Slammed Kirit Somaiya

पुण्यातील कोविड सेंटरचे ( corruption allegations in COVID center ) काम एका चहावाल्याला देऊन कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात केला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोमैय्यांनी यावेळी उंगली निर्देश केले. यावरून शिवसेना नेत्यांनी भाजप नेते किरीट सोमैय्यांचा ( Shivsena leaders Slammed Kirit Somaiya ) समाचार घेतला.

मनीषा कायंदे किरीट सोमैय्या
मनीषा कायंदे किरीट सोमैय्या
author img

By

Published : Feb 12, 2022, 5:53 PM IST

Updated : Feb 13, 2022, 6:09 AM IST

मुंबई - पुण्यातील कोविड सेंटर चहावाल्याला चालवायला दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला. शिवसेना नेत्यांनी यावरून सोमैय्यांवर लक्ष्य करताना, चहावाल्याची लायकी नाही? अस म्हणायचे आहे का? चहा विक्री करणाऱ्या पंतप्रधानांना देश चालवायला देणे चूक आहे का? असा जोरदार हल्लाबोल शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.

पुण्यातील कोविड सेंटरचे काम एका चहावाल्याला देऊन कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी पुण्यात केला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोमैय्यांनी यावेळी उंगली निर्देश केले. यावरून शिवसेना नेत्यांनी भाजप नेते किरीट सोमैय्यांचा समाचार घेतला. शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे ( Shivsena spokesperson Kishor Kanhere ) म्हणाले, की कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. जगभरात याचे कौतुक होत आहे. न्यायालयानेही महाराष्ट्र सरकारचे गोडवे गायले आहेत. भाजप नेत्यांना हे खटकत असून त्यांच्या पोटात जळजळ आणि मळमळ व्हायला लागली आहे. या नेत्यांसाठी वेगळे सेंटर उभारून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे, असे मत शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी व्यक्त केले. चहावाल्याची चौकशीची मागणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील चहा विकला का ? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली.

प्रतिक्रिया
हेही वाचा-India China Dispute : उणे 40 डिग्री तापमानात ड्रॅगनला नमवण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा सविस्तर

सोमैय्या यांनी पुण्यात घातलेला गोंधळ हास्यास्पद आणि दयनीय -मनीषा कायंदे
कोविड सेंटरवरून वादळ निर्माण करण्याचा सोमैय्या यांचा प्रयत्न आहे. मात्र ते इथेही तोंडघशी पडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात पारदर्शक पद्धतीने काम केले. जगाने कामाची दखल घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे पारदर्शक काम भाजपला डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे खोटेनाटे आरोप केले जात आहेत. भाजपच्या सगळ्या नेत्यांना जळजळ व मळमळ बरोबरच आता मानसिक आजार जडला आहे. त्यावर इलाज करण्याची गरज असल्याचे शिवसेना आमदार तथा प्रवक्त्या मनीषा कायंदे ( Shivsena leader Manisha Kayande ) यांनी म्हटले आहे. चहावाल्याने कंत्राट घेतला की नाही हे तपासत येईल. परंतु, चहा विक्रीचा धंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील केला आहे. त्यामुळे अन्य कोणी करू नये का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपला कोणीही मनावर घेत नाही. त्यामुळे सोमैय्या यांनी पुण्यात घातलेला गोंधळ हास्यास्पद आणि दयनीय आहे, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा-निवडणुका असलेल्या राज्यात महाराष्ट्राच्या खतांचा साठा केंद्राने वळवला- कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचा आरोप

जनता त्यांना योग्य दिशा दाखवेल - सचिन अहिर

कृपया त्वरित आमच्या जवळच्या कोविड सेंटरमध्ये दाखल व्हा. चांगले वैद्यकीय उपचार आपल्या सेंटरमधून करून घेऊ. या जेणेकरून यांची पोटदुखी तळमळ व जळमळ कुठे तरी थांबेल. वायफळ बडबड महाराष्ट्रमध्ये सुरू आहे. याला आराम मिळेल, असे शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी म्हटले आहे. कोरोना काळात जगाने व न्यायालयाने राज्य सरकारचे कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड सेंटरमध्ये केलेल्या पारदर्शक कामाला गालबोट लावण्याचा भाजपचा थातूरमातूर प्रयत्न आहे. हिंमत असेल तर त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावे. परंतु राजकारण करून या विषयाला वेगळ्या दिशा दाखवू नये. चहावाल्याला कंत्राट दिले तर काय झाले? देशाचे पंतप्रधान या विषयावर ब्रँड अँबेसिडर आहेत. अशा थरावर जाऊन कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर जनता त्यांना योग्य दिशा दाखवेल, असे शिवसेना नेते सचिन अहिर ( Shivsena leader Sachin Ahir ) म्हणाले.

हेही वाचा-President In Ratnagiri : आंबडवेची यात्रा मला तीर्थक्षेत्रासमान आहे, राष्ट्रपतींनी केली मराठीतून भाषणाला सुरुवात

सोमैय्या यांच्यावर उपचार करण्याची गरज- नगरसेविका शीतल म्हात्रे
रोज उठून वेगवेगळ्या आणि बेताल विषयावर शिवसेनेवर आरोप करणे, हे मला वाटते सोमैय्या यांचे नेहमीचे काम झालेले आहे. त्यांनी जागे व्हावे. महाराष्ट्र सरकार किती उत्तम काम करते हे बघावे. परंतु, सोमैय्यांना शिवसेना द्वेषाची कावीळ झालेली आहे. सोमैय्या यांना एका चांगल्या हॉस्पिटलला दाखवून त्यांच्यावर उपचार करणे अतिशय आवश्यक असल्याचे शिवसेना प्रवक्त्या तथा नगरसेविका शीतल म्हात्रे ( Shivsena leader Shital Mhatre ) यांनी म्हटले आहे.

Last Updated : Feb 13, 2022, 6:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.