ETV Bharat / city

Sanjay Raut : 'बाळासाहेबांनी शिकवलं रडायचं नाही, सत्यासाठी...'; संजय राऊतांचे विरोधकांना पत्र - संजय राऊत मराठी बातमी

संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना अटक केल्यानंतर विरोधीपक्षातील नेत्यांना त्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. त्याबद्दल त्यांनी पत्र लिहीत कृतज्ञता व्यक्त केली ( shivsena leader Sanjay Raut letter opposition party leaders ) आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut
author img

By

Published : Aug 5, 2022, 6:44 PM IST

Updated : Aug 5, 2022, 7:42 PM IST

मुंबई - कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमजलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. त्यांना सोमवारपर्यंत ( 8 ऑगस्ट ) ईडी कोठडी सुनावली आहे. त्यात आता संजय राऊतांनी विरोधकांना पत्र लिहलं आहे. त्या पत्राद्वारे राऊत यांनी कठीण प्रसंगी सभागृहाच्या आत आणि बाहेर त्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पत्रात त्यांनी 'बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं रडायचं नाही सत्यासाठी लढायचं' असे म्हटले ( shivsena leader Sanjay Raut letter opposition party leaders ) होते.

संजय राऊत यांच्या अटकेनंतर अनेक विरोधी पक्षांनी त्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला. आता राऊत यांनी पत्र लिहून त्या सर्व पक्षांचे आभार मानले आहेत. या, पत्रात राऊत यांनी त्यांच्यासाठी आवाज उठवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, द्रमुक, सीपीआय, सीपीआयएम या सर्व पक्षांचे आभार मानले आहेत.

Sanjay Raut letter opposition party leader
संजय राऊत यांचे विरोधी पक्षातील मित्रांना लिहलेलं पत्र

राऊत यांनी पत्रात काय म्हटलं? - आयुष्याच्या कठीण काळात आपले मित्र कोण असतात हे दिसतं. आता माझ्याविरोधात सुरु असलेल्या राजकीय सूड नाट्यामध्ये तुम्ही दिलेल्या पाठिंब्याचा मी आभार मानतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय तपास यंत्रणेच्याद्वारे हेतु परस्पर चौकशी करण्यात येत आहे. सत्यासाठी माझा लढा सुरु असेल. कितीही दबाव आणला तरी लढा सुरु राहिल. मी दबावाल बळी पडणार नाही. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, रडायचं नाही, लढायचं सत्यासाठी लढायचं.

'काळ आणि संयम ही दोन प्रमुख शस्त्र' - या लढ्यात माझ्या पाठिशी शब्दांचे बळ देण्यात तसेच कृती आणि विचारसरणीतून पाठिशी राहण्यात तुम्ही साथ दिली. त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. संसदेत आणि संसदेबाहेर माझ्या पक्षाने मांडलेल्या भूमिकेशी तुम्ही सहमत राहिलात. काळ आणि संयम ही दोन प्रमुख शस्त्र असतात. हाच विचार आणि बाळासाहेब ठाकरेंची शिकवण तसेच उद्धव ठाकरे, माझे कुटुंबीय, हितचिंतकांच्या साथीने या लढाईत मी जिंकेन, असा विश्वास आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा, असेही संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा - Deepak Kesarkar : सुशांतसिंह प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा राणेंकडून डाव; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

Last Updated : Aug 5, 2022, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.