मुंबई - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपचे नेते सोमवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत आहेत. राज्य विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस उलटून गेले तरी अद्यापही कोणत्याही पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यात आला नाही. मात्र सोमवारी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने सत्ता स्थापनेला वेग आल्याचे दिसत आहे. मात्र ही भेट राजकीय नसून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचेही राजभवन येथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार राज्यपालांची भेट, शिवसेनाही स्वतंत्रपणे राज्यपालांना भेटणार
शिवसेना आणि भाजप नेत्यांची स्वतंत्र भेट
शिवसेना आणि भाजपचे नेते राज्यपालांची स्वंत्र भेट घेत आहे. राज्यात सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या असून बुधवारी भाजपाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यापूर्वी सेनेच्या नेत्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न शहा यांच्याकडून केला जाणार आहे. राज्यात युतीचे सरकार स्थापन केले जाईल असे भाजपकडून नुकतेच स्पष्ट करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यपालांची भेट होत असली तरी या भेटीत केवळ दीपावलीच्या शुभेच्छा हाच विषय असल्याचे राजभवन येथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
-
Mumbai: Shiv Sena leader Diwakar Raote arrives at Raj Bhavan to meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari pic.twitter.com/kwj6dWlNNA
— ANI (@ANI) October 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai: Shiv Sena leader Diwakar Raote arrives at Raj Bhavan to meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari pic.twitter.com/kwj6dWlNNA
— ANI (@ANI) October 28, 2019Mumbai: Shiv Sena leader Diwakar Raote arrives at Raj Bhavan to meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari pic.twitter.com/kwj6dWlNNA
— ANI (@ANI) October 28, 2019